Take a fresh look at your lifestyle.

भाजपने दिले आव्हाडांना प्रत्युत्तर; कॉंग्रेसच्या वाघामारेंनी दिली महत्वाची आठवण करून

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्र सरकारतर्फे लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा होण्याच्या मुद्द्यावर भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. इतर युरोपीय देशांचे दाखले न फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आर्थिक मदतीचे आव्हान दिले आहे. त्यावर राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिल्याने भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement

Dr. Raju waghmare on Twitter: “@BJP4Maharashtra @Awhadspeaks @BJP4India @Dev_Fadnavis खोटे बोलणार व @Awhadspeaks उलट खोटे ठरवणार?किसान सन्मान योजना 2019मधे सुरु कोरोनासाठी नाही ! केंद्रातील कोणतेही सरकार दरवर्षी शेतमाल खरेदीसाठी सरासरी पैसे खर्च करते,ते हेच पैसे #भाजप “कोरोना मदत म्हणून सांगते!”जनाची नाही तर मनाची .. ठेवा! @TV9Marathi https://t.co/HWpM3Ly0ah” / Twitter

Advertisement

केंद्राच्या मदतीची आठवण आव्हाड यांनी करून दिली होती. त्यावर भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील हजारो कोटींचा लेखाजोखा मांडण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, त्यातील अनेक योजना आणि मदत ही जुन्या काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झाल्याने ती नैसर्गिकरीत्या महाराष्ट्राला मिळणे कशी अपेक्षित आहे. याकडे काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी लक्ष वेधले आहे.

Advertisement

भाजपने प्रत्युत्तर देताना म्हटले होते की, केंद्राने महाराष्ट्राला भरभरून दिलं. कोरोनाकाळात केंद्र सरकारच्या पॅकेजमधून ७८,५०० कोटी रुपये एकट्या महाराष्ट्राला दिले. कोरोनाकाळात गोरगरीब, कष्टकरी सगळ्यांचा विचार करून मुबलक प्रमाणात योजनांद्वारे पैसे दिले. @Awhadspeaksघरात बसून लाईव्ह करण्याशिवाय तुम्ही काय केलं?

Advertisement

त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आव्हाड साहेब, स्वतः काही न करता केंद्राला प्रश्न विचारायचं धाडस कसं करता? केंद्राने जनधन योजनेचे १९५८ कोटी रुपये महाराष्ट्राला दिले. सिलेंडर दिले, रेल्वेगाड्यांसाठी, आरोग्यासाठी निधी दिले. तुम्ही काय केलं? महाराष्ट्राला कोरोनाकाळात केंद्राकडून मोठ्या प्रमाणात मदत देण्यात आली. अनेक शासकीय, खाजगी प्रयोगशाळांना मान्यता देण्यात आली. पीपीई किट्स, एन ९५ अशी कोरोना सामग्री पुरवण्यात आली. तुम्ही काय केलं? तुम्ही फक्त उठसूट केंद्राला दोष देण्याचं काम केलं.

Advertisement

भाजपा महाराष्ट्र on Twitter: “आव्हाड साहेब, कसं हो तुमचं अज्ञान जगासमोर आणलं? केंद्राने राज्याला १७२६ कोटी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे दिले. तुमच्यातल्या काहींनी फक्त बांधावर जाऊन थापा मारल्या… तुमच्याचाने होत काही नाही तरी, तुम्ही बोलता किती? @Awhadspeaks https://t.co/v5xzJ63SDa” / Twitter

Advertisement

आव्हाड साहेब, कसं हो तुमचं अज्ञान जगासमोर आणलं? केंद्राने राज्याला १७२६ कोटी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे दिले. तुमच्यातल्या काहींनी फक्त बांधावर जाऊन थापा मारल्या… तुमच्याचाने होत काही नाही तरी, तुम्ही बोलता किती? आव्हाडांनी बोंबलून बोंबलून विचारलं की केंद्रानं राज्याला काय दिलं? आव्हाडसाहेब केंद्राने महाराष्ट्राला कोरोनाकाळात अन्न-धान्य पुरवलं, स्थलांतरित मजुरांसाठी १२२ कोटी रुपये दिले, असेही भाजपने म्हटलेले आहे.

Advertisement

त्यावर वाघमारे यांनी म्हटले आहे की, भाजप आणि फडणवीस खोटे बोलणार आणि आव्हाड साहेब त्यास खोटे ठरवणार? किसान सन्मान योजना 2019मधे सुरु कोरोनासाठी नाही ! केंद्रातील कोणतेही सरकार दरवर्षी शेतमाल खरेदीसाठी सरासरी पैसे खर्च करते,ते हेच पैसे #भाजप “कोरोना मदत म्हणून सांगते!”जनाची नाही तर मनाची .. ठेवा!

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply