Take a fresh look at your lifestyle.

अवताडे-काळे यांच्यामुळे भाजपला धक्का; पहा नेमके काय आव्हान असेल पंढरपुरात..!

सोलापूर :

Advertisement

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तब्बल १९ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. राष्ट्रवादीकडे असलेली ही जागा ताब्यात घेण्यासाठी राज्यात विरोधी पक्षात असलेला भाजप सरसावला आहे. त्यासाठी या पक्षाने समाधान अवताडे यांना सहमतीचे उमेदवार म्हणून उमेदवारी दिली आहे. मात्र, पक्षांतर्गत गटबाजीमुळे येथेही भाजपला मोठाच धक्का बसला आहे.

Advertisement

भाजपच्या माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते गटाचे समजल्या जाणाऱ्या आणि सहराकारात मोठी पकड असलेल्या बबनराव अवताडे आणि साखर कारखानदार असलेल्या कल्याणराव काळे यांनी पक्षाची साथ सोडली आहे. बबनराव अवताडे यांचे पुत्र सिद्धेश्वर यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. तर, काळे यांनी राष्ट्रवादीशी जवळीक साधली आहे.

Advertisement

अशा पद्धतीने या दोन्ही नेत्यांनी भाजपला ऐन निवडणुकीत धक्का दिल्याने विजयाचा दावा करणाऱ्या अएक कार्यकर्त्यांना मोठा झटका बसला आहे. आता यातून भाजप उमेदवार समाधान अवताडे हे कसा मार्ग काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

तर, दुसरीकडे शिवसेनेच्या बंडखोर नेत्या शैला गोडसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांचे अर्ज कायम राहिल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यासाठीचीही डोकेदुखी वाढली आहे. त्यावर महाविकास आघाडी कशी मात करणार यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply