Take a fresh look at your lifestyle.

‘पंढरपूर’साठी १९ जण रिंगणात; पहा कोणामध्ये होणार आमदारकीसाठी लढत, विजयाचे दावे करणारे हतबल..!

सोलापूर :

Advertisement

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत कोण उमेदवार रिंगणात असणार हे आता स्पष्ट झालेले आहे. येथे महाविकास आघाडी आणि भाजप या दोन्हींना बंडखोरीचा फटका सहन करावा लागल्याने यंदा ही निवडणूक चौरंगी / पंचरंगी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विजयाचे दावे करणाऱ्यांच्याही तोंडचे पाणी पळाले आहे.

Advertisement

पोटनिवडणुकीसाठी तब्बल ३८ उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर छाननी प्रक्रियेत ८ अर्ज बाद झाले. तर, वैध ३० अर्जापैकी ११ जणांनी आपले अर्ज माघारी घेतले घेतल्याने आता १९ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. त्यांच्यात येथील आमदारकीसाठी सरळ लढत होणार आहे.

Advertisement

भाजपच्या मोहिते गटाचे समजल्या जाणाऱ्या सिद्धेश्वर अावताडे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिल्याने भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. तर, शिवसेनेच्या बंडखोर नेत्या शैला गोडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांचे अर्ज कायम राहिल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यासाठीचीही डोकेदुखी वाढली आहे.

Advertisement

सध्या रिंगणात उरलेले उमेदवार असे :

Advertisement
  • राष्ट्रवादी काँग्रेस : भगीरथ भारत भालके
  • भारतीय जनता पार्टी : समाधान महादेव आवताडे
  • बहुजन विकास आघाडी : शैला धनंजय गोडसे
  • स्वाभिमानी शेतकरी संघटना : सचिन अरुण शिंदे
  • महाराष्ट्र विकास आघाडी : संजय नागनाथ माने
  • बळीराजा पार्टी :
  • राजाराम कोंडिबा भोसले
  • बहुजन महापार्टी : सिध्देश्वर भारत आवारे
  • वंचित बहुजन आघाडी : बिराप्पा मधुकर मोटे
  • अपक्ष : संतोष महादेव माने, संदीप जनार्दन खरात, नागेश प्रकाश पवार, अभिजित वामनराव आवाडे-बिचकुले, सुनील सुरेश गोरे, सीताराम मारुती सोनवले, सिध्देश्वर बबन आवताडे, सुदर्शन रायचंद खंदारे, कपिलदेव शंकर कोळी, सुदर्शन पांडुरंग मसुरे, बिरुदेव सुखदेव पापरे

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply