Take a fresh look at your lifestyle.

जाहीर माफी : हॉपशुटच्या शेतीचा दावा खोटाच; पहा नेमके काय आहे वास्तव, वाचा महत्वाची माहिती

वाचक बांधवांची जाहीर माफी. त्याचे कारणही तसेच आहे, कृषीरंग या वेब पोर्टलहून दि. ३१ मार्च रोजी ‘बाब्बो! ‘या’ फळभाजीला मिळतोय चक्क १ लाख रुपये प्रति किलोचा भाव; वाचा ही भन्नाट माहिती’ मथळ्याखाली एक वृत्त प्रसिद्ध केले आहे. मात्र, उलट तपासणी केल्यानंतर बातमीत अमरेश सिंग यांच्याकडून करण्यात आलेले काही दावे खोटे असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे वाचकांनी हॉपशूटची शेती करतांना विशेष काळजी आणि तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन आम्ही करत आहोत.

Advertisement

जगातील सर्वात महागडी भाजी पिकवली जातेय बिहारमध्ये; किलोसाठी मोजावे लागताहेत 1 लाख रुपये, वाचा संपूर्ण विषय – Krushirang

Advertisement

अमरेश सिंगच्या मुलाने फेटाळला  ‘दावा

Advertisement

न्यू इंडियन एक्स्प्रेसने सर्व प्रथम याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याआधारे आम्हीही या वृत्तास प्रसिद्धी दिली. मात्र, एनबीटी डॉट कॉमने याची उलट तपासणी केली असता शेतकरी अमरेशसिंग यांचा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. अमरेशसिंग यांचा मुलगा शुभमने गावात हॉप शूटची लागवड होत नसल्याचे माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितल्याने खळबळ उडाली आहे.  

Advertisement

जेव्हा एनबीटीची टीम त्यांच्या करमडीह गावी पोहोचली हॉप शूटच्या बाबत चौकशी केली गेली, तेव्हा त्यांचा मुलगा शुभम सिंगने हा धक्कादायक खुलासा केला. ते म्हणाले की, ‘या गावात हॉप शूटची लागवड होत नाही. या प्रदेशाच्या पर्जन्यमानानुसार येथे त्याची लागवड शक्य नाही. हॉप शूटची लागवड म्हणून अमरेश सिंग ज्याचे वर्णन करीत होते ते म्हणजे मेथीचे शेत होते’. 

Advertisement
Source : New Indian Express

यारोगांच्या उपचारांमध्ये हॉप शूट उपयुक्त 

Advertisement

वृत्तानुसार, टीबीसारख्या रोगाशी लढायला मदत करणारी अँटीबॉडी तयार करण्यात हॉप-शूट्स उपयुक्त आहेत. याचा उपयोग कर्करोगाची औषधे तयार करण्यासाठी देखील केला जातो. बीअर बनवण्यासाठीही त्याची फुले वापरली जातात. उर्वरित डफळे व फांद्या अन्नपदार्थात वापरल्या जातात. यापासून लोणचे तयार केले जाते जे खूप महाग आहे. अमेरिकेतून हॉप शुटला सर्वाधिक मागणी आहे. 

Advertisement

बिहारमध्ये हॉप शूटची शेती शक्य नाहीः कृषी शास्रज्ञ 

Advertisement

कृषी शास्रज्ञ डॉ. नित्यानंद यांच्याशी याबाबत बोलले असता त्यांनी हा दावा सपशेल खोटा असल्याचे म्हटले आहे. बिहारमध्ये हॉप शूटची लागवड शक्य नाही. हे एक थंड हवामानातील पीक आहे, जेथे तापमान 10-12 डिग्रीपेक्षा कमी आहे. औरंगाबाद आणि परिसरातील तापमान जास्त असल्याने हॉप शूट लागवड शक्य नाही. अशा परिस्थितीत येथे त्याची लागवड पूर्णपणे खोटी आहे.

Advertisement

हॉप शूट इतके महाग का आहे ?

Advertisement

हॉप शूट्स या जगातील सर्वात महागड्या भाजीचे नाव आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एक किलो हॉप शूटची किंमत सुमारे 82 हजार रुपये आहे. हॉप शूट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हे बर्याशच गंभीर आजारांच्या उपचारांमध्ये वापरले जाते, ज्यामुळे त्याचे मूल्य खूप जास्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार जर्मनीत या भाजीपाल्याची लागवड सुरू झाली. मग हळूहळू त्याची लागवड इतर देशांमध्येही होऊ लागली.

Advertisement

हॉप शूट्सला युरोपियन देशांमध्ये मोठी मागणी 

Advertisement

युरोपियन देशांमध्ये याची बरीच लागवड केली जाते. ब्रिटन आणि जर्मनीमध्ये लोकांना हे खूप आवडते. हॉप शूट्सच्या लागवडीसाठी वसंत ऋतूतील कालखंड अतिशय योग्य मानला जातो. भारत सरकार सध्या या भाजीपाल्याच्या लागवडीबद्दल वैज्ञानिक संशोधन करीत आहे. वाराणसी येथील भाजीपाला संशोधन संस्थेमध्ये त्याच्या लागवडीबाबत बरेच काम सुरू आहे. अमरेश सिंग यांनी हॉप शूट्सच्या लागवडीसाठी सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे अशी मागणी केली आहे, जर त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले तर उर्वरित शेतकर्यांयचे नशिब पालटेल. 

Advertisement

Source : Hindi News: Latest News in Hindi, हिन्दी न्यूज़, Breaking News, लेटेस्ट हिंदी न्यूज़, Hindi Khabar, हिंदी खबरें, ब्रेकिंग न्यूज़ | Navbharat Times – Navbharat Times (indiatimes.com)

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement
2 Comments
  1. kishan says

    तुम्हीच खरे मिडिया… नाहीतर बाकीच्यांनि सुधा हि बातमी लावली पण खोटी आहे समजल्यावर माफी कोणीही नाही मागितली.
    great work sir

    1. Sachin Chobhe says

      आभारी आहोत.. काही सूचना असतील तर करीत जा..

Leave a Reply