Take a fresh look at your lifestyle.

अशा पद्धतीने मुंबई इंडियन्सने बदललं हार्दिक पांड्याचं नशिब..!

मुंबई :

Advertisement

आयपीएलचा प्रवास मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पांड्यासाठी एक कपोकल्पित कथा आहे. बडोद्याच्या या खेळाडूने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून टीम इंडियामध्ये स्थान पटकावले. हा स्फोटक अष्टपैलू खेळाडू मुंबई इंडियन्ससाठी खूप महत्वाचा आहे. त्याला संघातील नियमित खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे आणि यामुळेच प्रत्येक वेळी मुंबईचा संघ त्याला कायम खेळवतो. हार्दिकनेही संघाला निराश केले नाही आणि संघासाठी अनेकदा उत्कृष्ट खेळी केल्या आहेत.

Advertisement

हार्दिक पांड्याने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्सबरोबर आयपीएलचा प्रवास सुरू केला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार ठोकला होता. जेव्हा त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ८ बॉलमध्ये २१ धावा करून आपल्या संघाला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला होता तेव्हाच त्याची खरी ओळख जगासमोर आली. मुंबई इंडियन्सचे दुसरे विजेतेपद मिळविण्यात हार्दिक पांड्याचा मोलाचा वाटा होता.

Advertisement

हार्दिक पांड्या पहिल्या सत्रात ९ सामने खेळला. या ९सामन्यांत त्याने १८०.६४ च्या स्ट्राइक रेटने ११२ धावा केल्या, नऊ सामन्यांत त्याने केवळ एक विकेट मिळवली. मात्र हळूहळू त्याने आपली गोलंदाजीही सुधारली. आतापर्यंतच्या सात हंगामात त्याने ८० सामन्यांत ४२ बळी घेतले आहेत. त्याचवेळी, त्याने १५९ च्या स्ट्राइक रेटने १ हजार ३४९ धावा केल्या आहेत.

Advertisement

हार्दिकने नुकत्याच संपलेल्या वन डे मालिकेत १४४.९३ च्या स्ट्राईक रेटने तीन सामन्यांमध्ये १०० धावा केल्या. त्याचबरोबर टी २० मालिकेच्या पाच सामन्यात त्याने ८६ धावा केल्या. त्याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेत त्याने तीन सामन्यांत २१० धावा केल्या. त्याचबरोबर टी २० मालिकेत त्याने १५६ च्या स्ट्राइक रेटने ७८ धावा केल्या.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply