Take a fresh look at your lifestyle.

‘त्यावेळी’ आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करु नयेत; पीटरसनने दिला सर्व क्रिकेट बोर्डांना सल्ला

मुंबई :

Advertisement

आयपीएल २०२१ बद्दल इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने मोठे विधान केले आहे. तो म्हणाला की, सर्व क्रिकेट मंडळांनी हे समजून घेतले पाहिजे की, आयपीएल हा खेळाचा सर्वात मोठा इव्हेंट आहे आणि यावेळी कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले जाऊ नयेत, असा सल्ला त्याने दिला आहे.

Advertisement

आयपीएलमध्ये खेळायचे की २ जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची याबाबत इंग्लंडचे अनेक खेळाडू संभ्रमात आहेत. जर त्यांचा आयपीएल संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला तर त्यांना आयपीएलच्या अंतिम फेरीत किंवा राष्ट्रीय संघाकडून खेळावे लागेल. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाचे संचालक ॲशले जाईल्स आधीच म्हणाले आहेत की, इंग्लंड क्रिकेट बोर्ड खेळाडूंना दोन्हीपैकी काय खेळणे पसंत करायचे याबाबत भाग पाडणार नाही.

Advertisement

Krushirang on Twitter: “#मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #mahaforest #wildlife https://t.co/fJQnkWNWq0” / Twitter

Advertisement

केविन पीटरसनने सोशल मीडियावर लिहिले की, सर्व क्रिकेट मंडळांनी हे समजून घेतले पाहिजे की आयपीएल हा क्रिकेटचा सर्वात मोठा कार्यक्रम आहे. या काळात कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने होऊ नयेत. ‘व्हेरी व्हेरी व्हेरी सिंपल’. १४ इंग्लंडचे क्रिकेटपटू आयपीएल खेळत आहेत. यामध्ये ओयन मॉर्गन, जोस बटलर, बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम करन, टॉम करन, लियाम लिव्हग्स्िंटन, डेव्हिड मालन, जॉनी बेअरस्टो आदींचा समावेश आहे.

Advertisement

आयपीएलचे सामने ९ एप्रिल ते ३० मे दरम्यान चालतील. यावेळी ५ संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळतील. पाकिस्तान संघ सर्वाधिक सामने खेळेल. पाकिस्तान संघातील खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी नाही. पाकिस्तानशिवाय दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका आणि झिम्बाब्वेचे संघदेखील सामने खेळतील.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply