Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : म्हणून मुंबईत रस्ते व रेल्वे स्टेशनवर झालीय गर्दी; पहा नेमके काय आहे कारण

मुंबई :

Advertisement

काळजी घेऊन व्यवहार करतानाच रुग्णसंख्या कमी न झाल्यास पुढील २ दिवसात लॉकडाऊन किंवा आणखी कठोर निर्बंध जारी करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेले आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन होणार अशा अफवांना उत आला आहे. परिणामी मुंबईतून बाहेर पडण्यासाठीची लगबग करताना लाखो उत्तर भारतीय मजूर आणि नागरिक यांनी रेल्वे स्टेशनवर गर्दी केली आहे.

Advertisement

मुंबईत टाळेबंदीच्या भीतीने लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकावर गर्दी दिसायला लागली आहे. मोठ्या संख्येने लोक सूटकेस आणि बॅग घेऊन जाताना दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर दादर भाजी मंडई व बाजारपेठेत गर्दी जमली आहे. लॉकडाऊन झाल्यास लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी ही गर्दी असल्याचे म्हतेल जात आहे.

Advertisement

NBT Hindi News on Twitter: “महाराष्ट्र में कोरोना की बेकाबू स्पीड के बीच लॉकडाउन की आशंका बढ़ गई है। ऐसे में महाराष्ट्र से यूपी और बिहार की तरफ जाने वाले लोगों की संख्या अचानक बढ़ने लगी है। देखें मुंबई के लोकमान्य तिलक टर्मिनस रेलवे स्टेशन का वीडियो…#COVID19 #Mumbai https://t.co/WsMICG6oxf https://t.co/gJlMPukj6W” / Twitter

Advertisement

शनिवार व रविवार यावेळी जास्त संख्येने लॉक खरेदीसाठी बाहेर पडतात. मात्र, ही गर्दी तुलनेने जास्त असल्याचे अनेक माध्यम समूहांनी बातमीमध्ये म्हटलेले आहे. उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले होते की परिस्थिती सुधारली नाही तर लॉकडाऊन शेवटचा उपाय असेल. घर सोडू नये आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे फार महत्वाचे नसल्यास टाळण्याचे आवाहनही ठाकरे यांनी केले होते. दरम्यान, कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी शनिवारी दादर बाजारमधील गर्दीबद्दल ट्विटर पोस्ट केली आहे.

Advertisement

शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली. लोक सुटकेस आणि बॅग घेऊन जाताना दिसत आहेत. असंख्य लोक यूपी-बिहारमध्ये जात असल्याचे म्हणतात. दरम्यान, शुक्रवारी मुंबईत 8832 आणि राज्यात 47,827 नोंदी आल्या आहेत. मुंबईत 20 आणि महाराष्ट्रात 202 रुग्णांचा मृत्यू झाला. दादर आणि माहीम हे मुंबईतील नवीन हॉटस्पॉट बनले आहेत. कोविड डेथ ऑडिट कमिटीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे म्हणाले की, वाढत्या रूग्णांमुळे मृत्यूची संख्याही वाढेल, परंतु मृत्यूचे प्रमाण वाढणार नाही.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Sanjay Nirupam on Twitter: “दादर की सब्जी मंडी या अन्य बाज़ारों में भीड़ क्यों उमड़ रही है ? क्योंकि #लॉकडाउन के डर से लोग घर की ख़रीददारी करने के लिए टूट पड़े हैं। यह लॉकडाउन की धमकियों का दुष्परिणाम है। सरकार का काम लोगों की भावनाएँ भड़काना नहीं, उन्हें ढाढ़स बंधाना होता है। #COVIDSecondWave https://t.co/FKBTswhzWk” / Twitter

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply