Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ मुद्द्यावर अमेरिका झाली आक्रमक

दिल्ली :

Advertisement

पत्रकार डॅनियल पर्ल यांच्या हत्येप्रकरणी कोणतीही ठोस कार्यवाही करू न शकलेल्या पाकिस्तानवर आता अमेरिका भडकली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी सातप व्यक्त करीत म्हटले आहे की,  पर्लच्या कुटुंबीयांशी बोलून त्यांना न्यायाचे आश्वासन दिले आहे. त्या मारेकर्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडण्यात येणार नाही.

Advertisement

पाकिस्तान सरकारच्या ढिसाळ वृत्तीमुळे या हत्येचा मुख्य गुन्हेगार अहमद उमर सईद शेख हा सरकारी अतिथीगृहात विश्रांती घेत आहे. त्यातील दोषींना संपविण्याचा अमेरिकेचा संकल्प आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता नेड प्राइस यांनी शुक्रवारी सांगितले की, ब्लिंकेन यांनी आज डॅनियल पर्लच्या कुटुंबीयांशी भेट घेतली अये. डॅनियलच्या अपहरण आणि हत्येमध्ये सामील असलेल्यांना न्याय देण्यासाठी अमेरिकी सरकार कटिबद्ध आहे.

Advertisement

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात ब्रिटीश मूळ असलेल्या अल कायदाचा दहशतवादी अहमद ओमर सईद शेख याच्यावर दोषारोप सिद्ध करण्यासाठी अभियोग पक्ष अपयशी ठरल्याने फटकारले होते. 1999 मध्ये भारताने शेख याच्यासह जैश-ए-मोहम्मद प्रमुख मसूद अझर आणि मुश्ताक अहमद जरगर या दहशतनाद्यांना सोडले होते.

Advertisement

प्रवाशांना सोडण्याच्या बदल्यात त्यांना अफगाणिस्तानातून जाण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर तीन वर्षांनंतर पर्लला ठार मारण्यात आले होते. 2002 मध्ये वॉल स्ट्रीट जर्नलचे दक्षिण आशिया ब्यूरोचे प्रमुख डॅनियल पर्ल यांचे कराची येथून अपहरण केले गेले होते. त्यावेळी पर्ल हे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि अल कायदा यांच्यातील संबंधांबद्दलच्या बातमीचे संकलन करत होते. त्यानंतर पर्ल यांचा शिरच्छेद करून खून करण्यात आला.

Advertisement

कराची सेंट्रल जेलच्या आवारात अल-कायदाचा दहशतवादी अहमद उमर सईद शेख याला तुरूंगातून नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत पाठविण्याची अधिसूचना जारी केली आहे. तीन सदस्यांच्या खंडपीठाने मृत्यूदंडाची शिक्षा भोगत असलेल्या या कैद्यांच्या तिकडे पाठवायच्या सूचना केल्या आहेत. कारण, सध्या अधिकाऱ्यांच्या कृपेने हा दहशतवादी चक्क सरकारी विश्रामगृहात मजा मारत होता.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply