Take a fresh look at your lifestyle.

म्हणून राहुरी विद्यापीठाचे कृषी माहिती केंद्र बनलेय शेतकऱ्यांचे ज्ञानमंदिर..!

कृषि विद्यापीठाने विकसित केलेले सुधारित तंत्रज्ञान विविध माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र ऑगस्ट २००१ पासून करत आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातून येणाऱ्या शेतक-यांना या केंद्रामार्फत सर्व कृषि तंत्रज्ञानाची माहीती दिली जाते. शेतकरी विद्यापीठात आल्यानंतर प्रवेशव्दाराजवळ असलेल्या कृषि तंत्रज्ञान माहीती केंद्रात जनसंपर्क अधिकाऱ्यांकडील कार्यालयात येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची नोंदणी केली जाते. नोंदणी केल्यानंतर जनसंपर्क अधिकारी आणि कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील शास्त्रज्ञांद्वारा अद्ययावत अशा दालनात शेतकऱ्यांना विद्यापीठाबाबत त्याचबरोबर विद्यापीठातील विविध संशोधनाची सचित्र प्रदर्शनाची माहीती दिली जाते. कृषि माहितीची देवाण घेवाण झाल्यानतर शेतक-यांची गरज आणि त्यांच्याकडे असलेल्या वेळेनुसार जनसंपर्क अधिकारी त्यांना भेट घेण्याबाबत विद्यापीठातील विविध प्रकल्पांचे क्रम ठरवुन देतात.

Advertisement

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सेवा

Advertisement
 • कृषि माहिती व तंत्रज्ञान मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे.
 • शेतक-यांच्या कृषिविषयक समस्या सोडविण्यासाठी योग्य मार्गदर्शन व सल्ला देणे.
 • नवीन कृषि तंत्रज्ञानाचा विविध माध्यमातून शेतकऱ्यासाठी प्रसार करणे.
 • कृषि प्रदर्शने / मेळावे / प्रशिक्षण शिवारफेरीमध्ये शेतकरी-शास्त्रज्ञ मचांतील सभासदांना निमंत्रित करणे, तसेच शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाद्वारे कृषि विद्यापीठासमवेत शेतक-यांचा सहभाग वाढविणे.
 • पीक प्रात्याक्षिकांच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना समजावून सांगणे.
 • पीक व पशुविकास उत्पादनातील दरी भरुन काढणेसाठी मदत करणे.
 • विक्री व सल्ल्याच्या सहाय्याने शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा वाढविणे.
 • शेतकरी मेळावे, शिवार फेरी आणि कृषि प्रदर्शनाद्वारे शेतकऱ्यांना कृषि तंत्रज्ञानाचा मोठ्याप्रमाणावर प्रसार करणे.
 • कृषि संशोधक व कृषि विस्तारक यांची कृषि समस्या प्रत्याभरणाविषयी चर्चा घडवूनआणणे.
 • कृषि क्षेत्रात शेतकरी महिलांचा अधिक कार्यक्षम सहभाग वाढविणे.
 • फिरते पीक चिकित्सालयाच्या माध्यमातून पाणी, माती व पीक नमन्यांची तपासणी करणे.
 • पिकांवरील किड व रोग निदान आणि नियंत्रणाचे उपाय करणेबाबत मार्गदर्शन करणे.
 • शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पत्राद्वारे उत्तरे, मार्गदर्शन व सल्ला देणे.

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील विविध सुविधा

Advertisement
 • विषय विशेषज्ञांकडून शेतकऱ्यांना कृषि विषयक सल्ला व मार्गदर्शन.
 • शेतकऱ्यांना इंटरनेटद्वारे सर्व पिकांची माहिती घेण्याची मोफत सुविधा.
 • अद्ययावत कृषि माहिती प्रदर्शन व फोटो गॅलरी.
 • शेतकऱ्यांची बैठक व सभा घेण्यासाठी दृकश्राव्य सभागृह.
 • व्हिडीओ / सीडीद्वारे कृषि माहितीचा प्रसार.
 • एक खिडकी अंतर्गत विद्यापीठाची विविध उत्पादने भाजीपाला बियाणे, जैविक किटकनाशके व जैविक खते उपलब्ध करून देणे.
 • गांडुळखत, नाडेप, शुन्य उर्जाधारित शीतगृह, पाणी व्यवस्थापन, मृद जलसंधारण विषयक प्रतिकृती.
 • कृषि दर्शनी, श्री सुगी व इतर कृषि विश्रयक प्रकाशने विक्री.

केंद्रातून होणारी बियाणे, उत्पादने, कृषि प्रकाशने विक्री

Advertisement
 • बियाणे : विद्यापीठ प्रक्षेत्रावर उत्पादित तृणधान्ये, कडधान्ये, भाजीपाला आदी बियाणे उपलब्धतेनुसार विक्री
 • कलमे : आंबा, डाळींब, पेरु, चिकू, नारळ आदि.
 • जैविक उत्पादने : रायझोबियम, अॅझटोबॅक्टर, अॅसिटोबॅक्टर, पीएसबी, कंपोस्ट कल्चर, हेलिओकिल आदि जैविक किटकनाशके व जैविक खते विक्री.
 • प्रकाशने : कृषिदर्शनी, श्री सुगी, इतर कृषि तंत्रज्ञान विषयक प्रकाशने विक्री.

शेतकऱ्यांसाठी उपलब्ध दुरभाष्य / हेल्पलाईन सेवा

Advertisement
 • हेल्पलाईन / दुरभाष्य सेवा : (०२४२६) २४३८६१
 • किसान कॉल सेंटर : १८००-१८०-१५५१
 • संकेत स्थळ : http://mpkv.mah.nic.in
 • ईमेल : aticmpkv@rediffmail.com
 • फॅक्स : (०२४२६ : २४३८६१/२४३२३०)

शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम

Advertisement

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र सुरु झाल्यापासून ते आजतागायत केंद्रातील तसेच विद्यापीठातील शास्त्रज्ञ दररोज कार्यालयीन दूरध्वनी (०२४२६ २४३८६१ / २४३३७३) तसेच मोबाईल फोनवरुन विद्यापीठ कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील हजारो शेतकऱ्यांना गरजेनुसार माहिती देत आहेत.

Advertisement

स्त्रोत :

Advertisement

पुस्तकाचे नाव : प्रश्न शेतकऱ्यांचे उत्तरे कृषी तज्ञांची (वर्ष २०१७)

Advertisement

संकलक : डॉ. आनंद सोळंके, डॉ. कल्याण देवळाणकर, प्रा. मंजाबापू घोरपडे, डॉ. दत्तात्रय पाचारणे, डॉ. योगेश कांदळकर, डॉ. संदीप पाटील

Advertisement

कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचालनालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर

Advertisement

वेबसाईट : www.mpkv.ac.in ; फोन : ०२४२६ २४३८६१ ; ईमेल : aticmpkv@rediffmail.com

Advertisement

पुस्तक आर्थिक सहाय्य : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), अहमदनगर (कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य)

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply