Take a fresh look at your lifestyle.

उद्योगींची नोंदवही : स्टार्टअप म्हणजे ‘हे’; बिजनेस इच्छुकांनी वाचा ‘ही’ महत्वाची माहिती

सध्या मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडिया हे परवलीचे शब्द झालेले आहेत. म्हणजे तरुण किंवा व्यावसायिक यांच्या परवलीचे नाही हा. अजूनही सातत्याने ऐकायला मिळणारे हे शब्द फ़क़्त सरकारी धोरण, आकडेवारी आणि बातम्या यांच्यामध्ये अडकलेले आहेत. त्यामुळेच आपण एकूण व्यवसाय उभारणी, त्यासाठीचे स्किल्स, योजना आणि इतर रंजक माहितीचा खजिना ‘कृषीरंग’वर ‘उद्योगींची नोंदवही’ या सदरामध्ये प्रसिद्ध करणार आहोत.

Advertisement

आज आपण यामध्ये पाहणार आहोत की, स्टार्टअप म्हणजे नेमके काय? होय, खूप महत्वाचे आहे हे जाणून घेणे. कारण, स्टार्टअप याची व्याख्या म्हणजे फ़क़्त संबंधितांच्या जीवनातील पहिला प्रकल्प असे काहीही नाही. अनेकांना (हा लेख लिहिण्याची माहिती घेण्याच्या पूर्वी मलाही) वाटते की त्या तरुण-तरुणीच्या किंवा ग्रुपच्या जीवनातील पहिला-वाहिला उद्योग किंवा व्यवसाय म्हणजे स्टार्टअप होय.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जुन्या योजनांना अशा पद्धतीने नवे नाव देऊन नाविन्यपूर्ण उद्योग आणि व्यवसाय उभारणीला जोश आणला आहे. नवीन कल्पना, त्यातून नवीन उद्योग-व्यवसाय यांची सुरुवात आणि नव्या आव्हानात्मक आणि तंत्रज्ञानभिमूख जगात रोजगार निर्मिती या उद्देशाने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. यामध्ये केंद्र सरकारकडून संबंधित उद्योग व व्यावसायांना मदतीचा हात दिला जातो.

Advertisement

स्टार्टअपची व्याख्या अशी :

Advertisement
  • नवीन नोंदणी केलेली संस्था जिची स्थापना ५ वर्षांपूर्वी झालेली नसावी.
  • संबंधित व्यवसाय हा पूर्णपणे नवीन एनटीटी असावी. जुन्या व्यवसायापासून विभक्त किंवा पुनर्रचना अजिबात केलेली नसावी.
  • व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर आणि नाविन्याची जोड असलेली उत्पादन निर्मिती व सेवा असावी.
  • सध्या अस्तित्वात असलेली उत्पादने, सेवा यांच्या व्हॅल्यू अॅडिशनलाही यामध्ये महत्व आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून हे करावे.
  • उद्योगाची वार्षिक उलाढाल जास्तीतजास्त २४.९९ कोटी इतकीच असावी.

अशा पद्धतीने स्टार्टअपची व्याख्या करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपले वय किती आहे, यापूर्वी कोणते उद्योग-व्यवसाय चालू आहेत आणि बिजनेसमन म्हणून हिस्ट्री काय आहे याला यामध्ये काहीही स्थान नाही.

Advertisement

लेखन आणि संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

आपल्यालाही कशाची माहिती हवी असल्यास नेहमीप्रमाणे आम्हाला मेल करून (krushirang@gmail.com) आपण प्रश्न विचारू शकता. तसेच आपण एखाद्या विषयातील तज्ञ असल्यास आपले लेखनही (यापूर्वी कुठेही प्रसिद्ध न झालेले किंवा प्रसिद्ध झालेले असल्यास त्याचा संदर्भ देऊन) पाठवू शकता. आम्ही त्याला आपल्या नाव आणि संपर्क नंबरसह प्रसिद्धी देऊ.

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply