Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : वाझेप्रकरणी पुढे आलेत ‘हे’ मुद्दे; पहा नेमके कसे चालायचे खंडणीचे रॅकेट

मुंबई :

Advertisement

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळच्या अँटिलिया स्फोटके अाणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणामुळे अवघा देश कोड्यात पडला आहे. कारण, याचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दररोज धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा शेवट कशा आणि कुठे होणार, याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

टीम एनआयएच्या तपासात पुढे आलेले मुद्दे असे :

Advertisement
  • नरीमन पाँइटवरील एका पंचतारांकित हॉटेलमधून वाझे खंडणी वसुलीचे रॅकेट चालवत असे.
  • एका व्यावसायिकाच्या मदतीने त्याने १२ लाख रुपयांत १०० दिवसांसाठी हाॅटेलमधील रूम नं. १९६४ बूक केली होती.
  • संबंधित व्यावसायिकाला वाझे हा काही वादग्रस्त अशा कामात मदत करीत होता.
  • फेब्रुवारी महिन्यात वाझे हा खोट्या नावाने याच हॉटेलमध्ये थांबलेला होता. 
  • वाझेच्या संपर्कातील ३५ पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी केली असून डेप्युटी कमिशनर रँकपर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या अधिकाऱ्यांनाही आगामी काळात अटक होऊ शकते.

१५ दिवसांपासून तपास सुरू असलेल्या तरुणीला पकडण्यात एनआयएला टीमला यश आले असून वाझे जेथे खंडणी वसुलीचे कारस्थान रचायचा, तो अड्डाही शोधण्यात आला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे तिहारमध्ये कैदेतील एका अंडरवर्ल्ड म्होरक्याशी जुळत असल्याने आणखी एक धक्का बसला आहे.

Advertisement

यातील इतर महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
  • गिरगावातील एका रेस्तराँवर छापा मारून ६५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केलेले आहे.
  • स्कॉर्पिओची जबाबदारी स्वीकारणारा टेलिग्राम मेसेज तिहारमध्ये कैदेत असलेल्या इंडियन मुजाहिद्दीनच्या तहसीन अख्तरने पाठवला होता.
  • तुरुंगातून अंडरवर्ल्डच्या एका पंटरकडून पोस्ट करवून घेतलेली व्यक्ती थेट मुंबईतील १९९२ मधील चर्चित जेजे शूटआउट प्रकरणात दोषी आहे.
  • मीना जॉर्ज या तरुणीला अटक केली असून ती ठाण्यातील मीरा रोडवरील ७/११ कॉम्प्लेक्सच्या एका फ्लॅटमध्ये राहत होती.
  • पीयूष गर्गचा याच्या घरातून अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली असून मीना हीच वाझेला काळापैसा पांढरा करण्यासाठी मदत करत असल्याचा संशय आहे.

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply