Take a fresh look at your lifestyle.

अखेर ‘त्या’ मुद्द्यांवर आघाडीत काँग्रेसची बिघाडी; पहा नेमके काय आहेत शिवसेना-राष्ट्रवादीवर आक्षेप

मुंबई :

Advertisement

शुक्रवारी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक वांद्रे येथील एमसीए सभागृहात पार पडली. त्यामध्ये राज्याच्या विकासासह, मुंबईतील गुन्हेगारी, वाढते करोना रुग्ण यासह महाविकास आघाडीमधील निधीवाटपाचा मुद्दाही चर्चेत आला. त्यातील अनेक मुद्द्यांवर आक्षेप नोंदवत काँग्रेस पक्षाने शिवसेना-राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisement

आघाडी सरकार संकटात असतानाच घटक पक्षांतील मतभेद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झालेली आहे. भाजपने राज्यभरात सरकारच्या विरोधात रान उठवले असतानाच काँग्रेसच्या मंत्री आणि प्रमुख नेत्यांनी घटकपक्ष म्हणून आपली नाराजी उघड केल्याने सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Advertisement

परमबीर सिंह यांचे आरोप आणि सचिन वाझे प्रकरण यामुळे महाविकास आघाडी सरकारची मोठी बदनामी झाल्याने घटकपक्ष म्हणून याचा फटका काँग्रेस पक्षालाही सहन करावा लागत आहे. त्यावर बैठकीत अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisement

बैठकीला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, अस्लम शेख, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, बंटी पाटील आदी मंत्री आणि मुंबई अध्यक्ष भाई जगताप व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हजर होते.

Advertisement

बैठकीतील चर्चेचा वृत्तांत दिल्लीला पक्षश्रेष्ठींंना पाठवण्यात येणार आहे. काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बैठकीतील विविध मुद्द्यांबाबत आपले म्हणणे मांडणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

Advertisement

राज्यातील महाविकास आघाडी सरकार निधी वाटपात पक्षीय दुजाभाव करत असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मिळालेल्या खात्यांना पुरेसा निधी दिला जातो, अशी तक्रार काँग्रेसच्या सर्वच मंत्र्यांची आहे. याच मुद्द्यावर या पक्षाने आणखी आक्रमक भूमिका घेतली तर सरकारची अडचण होणार आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply