Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : विराटने मैदानावर जाहीरपणे ‘या’ खेळाडूला धमकावल्याचा आरोप..!

मुंबई :

Advertisement

भारत आणि इंग्लंडने यांच्यातील मालिका नुकतीच संपुष्टात आली असून यामध्ये टीम इंडियाने टेस्ट, वन डे आणि टी २० या तिनही प्रकारात मालिका विजय संपादित केला आहे. पण आता इंग्लंडचा फलंदाज ओली पोपने या मालिकेविषयी धक्कादायक खुलासा केला असून चेन्नईत खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने त्याला धमकावल्याचा आरोप त्याने केला आहे.

Advertisement

विराट कोहली मैदानावरील त्याच्या आक्रमक व रागीट स्वभावासाठी ओळखला जातो, पण पोपच्या म्हणण्यानुसार भारतीय कर्णधाराने त्याला कसोटी मालिकेच्या पुढील तीन सामन्यांसाठी घाबरवण्याचा प्रयत्न केला. वास्तविक, पोप ज्या घटनेचा उल्लेख करीत आहेत ती गोष्ट चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर पहिल्या कसोटीच्यावेळी घडली. या कसोटीत इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात ४७ षटकांत १७८ धावांवर बाद झाला, परंतु तरीही त्यांनी २२७ धावांनी सामना जिंकला.

Advertisement

पोपच्या म्हणण्यानुसार या सामन्यादरम्यान इंग्लंड जेव्हा दुसऱ्या डावात फलंदाजी करत होता तेव्हा खेळपट्टीवर चेंडू चांगलाच टर्न होत होता. पोप तेव्हा दुसऱ्या टोकाला फलंदाजीसाठी उभा होतो. त्यावेळी विराट कोहली त्याच्याकडे आला आणि म्हणाला, अशा सपाट खेळपट्टीवर तुम्ही शेवटची फलंदाजी करुन घ्या. या क्षणानंतर मला समजले की आता उर्वरित मालिकेत फलंदाजीसाठी परिस्थिती फार कठीण असणार आहे. परिणामी पुढील तीन कसोटी सामन्यांच्या सहा डावांमध्ये इंग्लंडला २०० पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply