Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. अवघड आहे की.. करोना इफेक्टमुळे ‘इतक्या’ कंपन्या बंद; म्हणून बेरोजगारीही वाढली..!

मुंबई :

Advertisement

सध्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील वाढते करोना रुग्ण लक्षात घेता लॉकडाऊन लागू करायचा किंवा नाही, यावर खल चालू आहे. अशावेळी यामुळे उद्योग, व्यवसाय आणि रोजगार यावर होणारे दुष्परिणामही चर्चेत आहेत. कारण, मागील वर्षभरात एकूण भारत देशात तब्बल ३८ टक्के कंपन्यांना टाळे ठोकण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे.

Advertisement

करोना इफेक्टमुळे अवघ्या जगाला मोठाच झटका बसला आहे. अनेकांचे रोजगार गेल्याने किंवा व्यवसाय व कंपन्या बंद पडल्याने कोट्यावधी देशोधडीला लागलेले आहेत. अशावेळी यातून मार्ग कसा काढायचा हाही कळीचा मुद्दा बनलेला आहे. कारण, महाराष्ट्र राज्यातही तब्बल ३६ टक्के कंपन्यांना टाळेबंदी जाहीर करावी लागलेली आहे. यावर दिव्य मराठी या दैनिकाने स्पेशल स्टोरी प्रसिद्ध केली आहे.

Advertisement

उद्योग-व्यवसाय अडचणीत येण्याचे मुद्दे असे :

Advertisement
  • आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हे नसल्याने सर्वच क्षेत्रातील कोट्यावधी कामगार गावी परतले.
  • वाहतुकीवर निर्बंध असल्याने कच्चा माल आणि तयार मालाची वाहतूक खोळबंली.
  • परदेशातून येणारा कच्चा माल पोहचू न शकल्याने उत्पादन थांबवावे लागले.
  • परिणामी एकूणच कंपन्यांचे चक्र बिघडल्याने उत्पादन बंद झाल्याने रेव्हेन्यू न मिळाल्याने कंपन्यांना व व्यवसाय बंद पडले.
  • देशभरातील एकूण नोंदणीच्या ३८ टक्के म्हणजेच ७,५५,५१० कंपन्या बंद कराव्या लागल्या

महाराष्ट्र राज्याची परिस्थिती :

Advertisement
  • देशातील सर्वाधिक ४,१८७०७ नोंदणीकृत कंपन्या महाराष्ट्रात आहेत. यापैकी १,५१,७७२ (३६%) कंपन्या बंद आहेत. 
  • अनेकांचे रोजगार गेल्याने बाजारपेठेत मंदी आलेली आहे.
  • श्रीमंतांना याचा विशेष फटका बसलेला नसून हातावर पोट असलेल्या मंडळींच्या किराणा आणि एकूण मासिक बजेटमध्ये तब्बल ४० टक्के इतकी घट झालेली आहे.
  • फ़क़्त खूप आवश्यक अशा इनरवेअर आणि किराणा सामानाचीच खरेदी सामान्य जनता करीत आहे.
  • पैसे खुडून खर्च करण्याची आणि भविष्यात काही संकट येण्याच्या दृष्टीकोनातून तयारी म्हणून कुटुंबातील जमाखर्चाचा ताळमेळ बसवला जात आहे.

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply