Take a fresh look at your lifestyle.

मंत्री आव्हाडांनी दिले फडणवीसांना ‘हे’ चॅलेंज; पहा लॉकडाऊन पॉलिटिक्समध्ये काय म्हटलेय त्यांनी..!

पुणे :

Advertisement

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी युरोपीय देशांमधील लॉकडाऊनचा आणि तिथे केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांचा अभ्यास करून महाराष्ट्रातील राज्य सरकारने लॉकडाऊन लागू करताना नागरिकांना ठोस मदतीचे आवाहन केले आहे. त्यावर केंद्र आणि राज्य यामधील नेमका भेद समजावून सांगत महाविकास आघाडीचे धडाकेबाज मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस यांना आव्हान दिले आहे.

Advertisement

फडणवीस यांनी म्हटलेले आहे की, बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय… पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय… पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे… पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले… त्यावर आव्हाडांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement

आव्हाड यांनी म्हटले आहे की, पण हे सगळे तिथल्या केंद्र सरकारनी केले आहे ….आपले केंद्र सरकार काय देणार …अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही … बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून देवेंद्रजी..

Advertisement

एकूणच लॉकडाऊनवरून राज्यात मतमतांतरे आहेत. दुसरा पर्याय सापडत नसल्याने सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आता महाविकास आघाडीचे सरकार नेमकी कोणती कार्यवाही करणार, याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

लॉकडाऊन लागू करताना नागरिकांना ठोस मदतीचा मुद्दा मांडला जात आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांनी याबाबत मागणी केली आहे. फडणवीस साहेबांनी त्याच्याही पुढे जाऊन लिहिलेय की, होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत… आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची… युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही दिलंय… तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा! विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही,तर आपण प्रत्यक्ष काय करतो,याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल.

Advertisement

पुढे त्यांनी लिहिले आहे की, आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत… पण, 7.4 बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय… फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत… पण, 3.4 बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय… बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय… पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय… पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे… पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले…

Advertisement

आणखी पुढे त्यांनी म्हटलेय की, डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती… पण, एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज… ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत… पण, 2,20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्‍यांना मदत एवढेच नाही तर वेतन न मिळणार्‍यांना 800 युरोंपर्यंत मदत ! फ्रान्सने तिसर्‍यांदा लॉकडाऊन लावला… पण, 120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले… हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’… पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला…

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply