Take a fresh look at your lifestyle.

TMC च्या महुआंनी दिले मोदींना ‘हे’ आव्हान; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

दिल्ली :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पश्चिम बंगालमधील मेळाव्यात म्हटले होते की, निवडणुकीचा आणि मतदारांचा एकूण कल पाहिल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचा पराभव स्वीकारला आहे. त्यावर खासदार महुआ मोईत्रा यांनी मोदीजींना प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement

नंदीग्राममधील आपला पराभव लक्षात घेऊन ममता यांनी दुसर्‍या सुरक्षित जागेवरुन निवडणूक लढवणण्याची तयारी केली असल्याचेही मोदींनी म्हटले आहे. यानंतर तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढविला आहे.

Advertisement

अलीकडेच टीएमसीमध्ये रुजू झालेल्या ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्यानंतर आता पक्षाच्या फायरब्रांड खासदार महुआ मोईत्रा यांनीही पंतप्रधानांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना महुआ मोइत्रा यांना प्रश्न विचारला की पंतप्रधानांच्या वतीने सत्ताधारी मुख्यमंत्री (ममता बॅनर्जी) असलेल्या व्यक्तीवर अशा मार्गाने टोमणे मारणे योग्य आहे का?

Advertisement

Mahua Moitra on Twitter: “‘Contesting from second seat?’ PM Modi jabs Mamata Banerjee Yes Mr. Prime Minister, she will. And it will be Varanasi! So go get your armour on.” / Twitter

Advertisement

 महुआ यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवर पंतप्रधानांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘होय श्रीमान पंतप्रधान, त्या (ममता) दोन जागांवर लढतील.. आणि ती वाराणसीची जागा असेल..! आपली शस्त्रे तयार करा.’

Advertisement

यापूर्वी गुरुवारी यशवंत सिन्हा यांनी ट्विट केले होते की, पंतप्रधान मोदी थेट भाजपच्या डर्टी ट्रिक्स विभागाचे प्रमुख असल्याचे स्पष्ट झाले आहे. नंदीग्राममध्ये मतदान सुरू असताना ममता बॅनर्जी यांनी आपल्या वतीने इतर कोणत्याही जागेवर निवडणूक लढवण्याचा मुद्दा उपस्थित करणे, ही आतापर्यंतची स्वस्त टिप्पणी आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply