Take a fresh look at your lifestyle.

म्हणून भाजप उमेदवाराच्या गाडीत सापडले EVM; पहा नेमके काय झाले प्रकरण, चौघे निलंबित

दिल्ली :

Advertisement

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) वापरणाऱ्या देशांची संख्या खूप कमी आहे. त्यातही भारत वगळता कोणत्याही मोठ्या आणि विकसित व विकसनशील देशात अशी यंत्र वापरली जात नाहीत. यातील संशयास्पद घटनांमुळे युरोपच्या अनेक देशांनी यावर बंदी आणली आहे. अशातच भारतात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा एका घटनेमुळे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र चर्चेत आलेले आहे.

Advertisement

आसाम विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच एका भाजप उमेदवाराच्या खासगी गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने 4 अधिकाऱ्यांना सस्पेंड केले आहे. मात्र, एकूणच यामुळे हे यंत्र आणि त्याचा राजकीय वापर चर्चेत आलेला आहे. काँग्रेस नेता प्रियांका गांधी यांनी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून म्हटले आहे की, अनेक प्रकरणे समोर येत आहेत आणि इलेक्शन कमिशनने (EC) यावर कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. 

Advertisement

Priyanka Gandhi Vadra on Twitter: “Every time there is an election videos of private vehicles caught transporting EVM’s show up. Unsurprisingly they have the following things in common: 1. The vehicles usually belong to BJP candidates or their associates. …. 1/3” / Twitter

Advertisement

दरम्यान, पाथरकांडी विधानसभा क्षेत्रातील स्थानिक लोकांनी ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या ज्या गाडीला अडवले ती गाडी निवडणूक आयोगाची नव्हती. तर, गाडी एका भाजप उमेवाराची असून यावरदेखील जमावांकडून हल्ला करण्यात आला होता. निवडणूक आयोगाच्या गाडीत बिघाड झाल्यामुळे जवळून जाणाऱ्या गाडीला त्यांनी लिफ्ट मागितली होती. नेमकी ती गाडी भाजप उमेदवाराची असल्याने हा गोंधळ उडाला आहे..!

Advertisement

व्हीएम मशीन सुरक्षित असून त्यासोबत कोणतीच छेडछाड झाली नसल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या गाडीत ठेवलेल्या EVM यंत्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये जोरात व्हायरल होत आहे.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply