Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : शेतकरी नेते टिकैत यांच्यावर हल्ला; पहा कोणी केला आणि कुठे घडला ‘हा’ भयंकर प्रकार

दिल्ली :

Advertisement

शेतकरी चळवळीचे नेते राकेश टिकैत यांच्या ताफ्यावर शुक्रवारी राजस्थानमध्ये एका जमावाने हल्ला केला. अलवरमधील हरसौरा येथे मेळाव्यात भाषण केल्यानंतर टिकैत बानसुरला जात असताना हा हल्ला झाला.

Advertisement

ततारपूरमध्ये एका जमावाने टिकैत यांच्या ताफ्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कारच्या काचावर दगड फेकण्यात आले. काचा फुटल्यावर त्यांच्यावर शाईही फेकण्यात आली. या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे.

Advertisement

Rakesh Tikait on Twitter: “राजस्थान के अलवर जिले के ततारपुर चौराहा, बानसूर रोड़ पर भाजपा के गुंडों द्वारा जानलेवा पर हमला किए गए, लोकतंत्र के हत्या की तस्वीरें https://t.co/aBN9ej7AXS” / Twitter

Advertisement

स्थानिक पोलिसांनी प्रसंगावधान राखून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. मग पोलिस सुरक्षेमध्ये टिकैत यांना तेथून बनसूर येथे हलविण्यात आले आहे. किसान चळवळीच्या व्यासपीठावरून टिकैट यांच्यावरील हल्ल्यासाठी भाजपाला दोषी ठरविण्यात आले आहे. पोलिसांनी हल्लेखोराची अज्ञात व्यक्ती म्हणून नोंद केली आहे.

Advertisement

स्थानिक किसान सभेच्या शेतकरी नेत्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, आम्हीही याला प्रत्युत्तर देऊ. ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’ असेच त्यांनी म्हटले आहे. भाजपवर या हल्ल्याचा आरोप करीत त्यांनी म्हटले आहे की, राजस्थानातही भाजपाची अवस्था हरियाणा आणि पंजाबसारखीच होईल.

Advertisement

NBT Rajasthan on Twitter: “#अलवर में किसान नेता @RakeshTikaitBKU के काफिले पर हमला। पथराव में #राकेश_टिकैत की गाड़ी के शीशे टूटे। असामाजिक तत्वों ने टिकैत पर फेंकी स्याही। https://t.co/tNTUjbyKY9 #BreakingNews #NBTRajasthan #rakeshtikait” / Twitter

Advertisement

स्थानिक शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे की, राजस्थानात अगोदरच सर्वांनी भाजपला सत्तेतून बाहेर केलेले आहे. आताही पुढील काळात तसेच होण्यासाठी भाजपच यानिमित्ताने तयार झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कृषी सुधारणा कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. काही खासगी कंपन्यांचे त्यामुळे फ़क़्त भले होणार आहे. त्यामुळे आम्ही कायदे मागे घेण्यासाठी आणखी जोरदार आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply