Take a fresh look at your lifestyle.

पंचायत पुरस्कारामध्ये सातारा, कोल्हापूर, नगरची बाजी; पहा कोणत्या पंचायत समित्या व 16 गावांना मिळाला पुरस्कार

पुणे :

Advertisement

केंद्र शासनामार्फत दिले जाणारे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारामध्ये कोल्हापूर, सातारा आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांनी बाजी मारली आहे. राज्यातील सातारा जिल्हा परिषदेसह गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) आणि राहाता (जि. अहमदनगर) या दोन पंचायत समित्यांना यामध्ये पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यातील १६ ग्रामपंचायतींनीही विविध गटांमध्ये पुरस्कार मिळवल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

Advertisement

दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार २०२१ (पडताळणी वर्ष २०१९-२०) जाहीर झालेल्या सर्वांचे मंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement

पुरस्कार जाहीर झालेली गावे अशी :

Advertisement
 • मान्याचीवाडी (ता. पाटण, जि. सातारा)
 • चंद्रपूर (ता. राहाता. जि. अहमदनगर)
 • लोहगाव (ता. राहाता. जि. अहमदनगर)
 • जाखोरी (ता. जि. नाशिक)
 • गोवरी (ता. मौदा, जि. नागपूर)
 • नागोसली (ता. इगतपुरी, जि. नाशिक)
 • येनीकोनी (ता. नरखेड, जि. नागपूर)
 • मरोडा (ता. मूल, जि. चंद्रपूर)
 • तमनाकवाडा (ता. कागल, जि. कोल्हापूर)
 • लेहेगाव (ता. मोर्शी, जि. अमरावती)
 • वांगी (ता. कडेगाव, जि. सांगली)
 • देगांव (ता. वाई, जि. सातारा)
 • अंजनवेल (ता. गुहागर, जि. रत्नागिरी)
 • पीरगयबवाडी (ता. घनसावंगी, जि. जालना)

सातारा जिल्हा परिषदेला ५० लाख रुपये, गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) आणि राहाता (जि. अहमदनगर) या पंचायत समित्यांना प्रत्येकी २५ लाख रुपये आणि १४ ग्रामपंचायतींना लोकसंख्येप्रमाणे ५ ते १५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम पुरस्कार स्वरुपात प्राप्त होणार आहे.

Advertisement

तर, नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार २०२१ हा राज्यातून मान्याचीवाडी (ता. पाटण, जि. सातारा) या ग्रामपंचायतीने पटकावला. या ग्रामपंचायतीस १० लाख रुपये रक्कम पुरस्कार स्वरुपात प्राप्त होईल. ग्रामपंचायत विकास आराखडा पुरस्कार २०२१ हा राज्यातून लोणी बुद्रुक (ता. राहाता, जि. अहमदनगर) या ग्रामपंचायतीने पटकावला. या ग्रामपंचायतीस ५ लाख रुपये रक्कम पुरस्कार स्वरुपात प्राप्त होईल.

Advertisement

बालसुलभ ग्रामपंचायत पुरस्कार २०२१ हा राज्यातून सिरेगाव (ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया) या ग्रामपंचायतीने पटकावला. या ग्रामपंचायतीस ५ लाख रुपये रक्कम पुरस्कार स्वरुपात प्राप्त होईल, अशी माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply