अहमदनगर :
लोकप्रतिनिधी जर प्रश्न सोडवणारा असेल आणि सामान्य माणसांशी संवाद ठेऊन विकासाला गती देणारा असेल तर काय करू शकतो हे खूप कमी वेळेला दिसते. आता आमदार रोहित पवार यांच्या निमित्ताने कर्जतकरांना याची साक्ष पटली आहे. खूप दिवस अडकून पडलेला रस्त्याचा प्रश्न रोहित पवार यांनी सोडवला आहे.
त्याबाबत माहिती देताना पवारांनी म्हटले आहे की, कर्जत शहरात नदीपात्रालगत असलेल्या रस्त्याचं काम अनेक दिवसांपासून वादात अडकलं होतं. हे वाद आपापसात मिटवून या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला. स्थानिकांना या रस्त्याचा उपयोग होईल. यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
एकूणच या स्थानिक भागातील रस्ता अडवून अनेकांचा खोळंबा करण्याचा हा मुद्दा होता. अगदी किरकोळ असलेला जागेचा वाद अनेकदा वर्षानुवर्षे रस्ते अडवण्यासाठी जबाबदार ठरतो. त्यामुळे सामान्य नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो. असेच प्रश्न लोकप्रतिनिधींनी सोडवण्याची आवश्यकता असते. तेच काम आमदारांनी केल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने कर्जतकरांनी दिली आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.
- बाब्बो.. सेवांच्या नावाखाली गरिबांच्या खिशात हात; पहा बँकांनी कसे लुटलेय आपल्याला..!
- शेळीपालन : लसीकरणाचे वेळापत्रक नक्की फॉलो करा; वाचा आणि अंमलबजावणीही करा
- शिक्षक-विद्यार्थी सर्वेक्षणातून पुढे आले ‘हे’ 5 मुद्दे; दहावी-बारावीची परीक्षा जूनमध्ये घेण्याची मागणी
- ‘त्यांच्या’सह अदानीही करणार ‘रिटेल क्रांती’; अमेझॉन, रिलायन्सपुढील आव्हाने वाढणार..!
- आयपीएल २०२१ : गोविंदाच्या जावयाची तुफानी खेळी; शाहरुखच्या केकेआरकडून घालतोय धुमाकूळ