Take a fresh look at your lifestyle.

मग मुख्यमंत्र्यांवर कारवाई नको का..; भातखळकरांनी उपस्थित केला प्रश्न, टाकला व्हिडिओही

मुंबई :

Advertisement

करोना रुग्णांची वाढती संख्या ही भारत देशासमोरील मोठी डोकेदुखी ठरली आहे. वाढत्या रुग्णांसह मृत्यूचे आकडेही वाढत असल्याने कडक निर्बंध लावले जाणार आहेत. मात्र, सरकारी यंत्रणेकडून सामान्य नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलला जात असतानाच नेते आणि अधिकारी यांना सूट असल्याचे दिसते. हाच मुद्दा एकांगी दृष्टीकोनातून का होईना भाजपने उचलला आहे.

Advertisement

आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबतचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हिंदुस्तान पोस्ट यांच्या नावाचा हा व्हिडिओ आहे. ज्यात नाशिकमधील एका लग्न समारंभात जास्त गर्दी असल्याने कारवाई केल्याचे उदाहरण टाकलेले आहे. त्याचवेळी मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कार्यक्रमात झालेली गर्दीही अधोरेखित केलेली आहे.

Advertisement

Atul Bhatkhalkar on Twitter: “मुख्यमंत्र्यांवर कारवाई कोण करणार? https://t.co/bYRrxURBlJ” / Twitter

Advertisement

मुख्यामंत्र्यांवर कारवाई कोण करणार, असा प्रश्न त्यासमवेत भातखळकर यांनी केला आहे. तसेच दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मुंबईच्या महापौरांनी नागरिकांना बेजबाबदार ठरवण्यापेक्षा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह कुटुंब सदस्य निघाले असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार कसा पडला याचा खुलासा करावा.

Advertisement

एकूणच भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह सर्वच पक्षाच्या राजकीय कार्यक्रमांतून मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. सरकारी कार्यक्रमांनाही गर्दी होत असताना दुर्लक्ष केले जाते. हाच मुद्दा भातखळकर यांनी राजकीयदृष्ट्या का होईना पुढे आणला आहे. आता त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना कोणती प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

ओंकार पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे की, तुम्ही सांगा मंदिरे उघडा पब्लिक ट्रान्सपोर्ट चालू करा मेळावे करा आणि काही झाल की त्याला ठाकरे सरकार जबाबदार.. अस कस चालेल?

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Atul Bhatkhalkar on Twitter: “मुंबईच्या महापौरांनी नागरिकांना बेजबाबदार ठरवण्यापेक्षा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह कुटुंब सदस्य निघाले असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार कसा पडला याचा खुलासा करावा… https://t.co/VfmfKhllmw” / Twitter

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply