Take a fresh look at your lifestyle.

वाव.. महिंद्रांनी नटराजनला गिफ्ट दिली कार; त्याबदल्यात त्यानेही दिली ‘ही’ खास भेट..!

मुंबई :

Advertisement

टी नटराजन हा डावखुरा मध्यम गोलंदाज. आयपीएल २०२० मध्ये उत्कृष्ट कामगिरीनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली. तेथे त्याने भारतासाठी तिन्ही स्वरूपात पदार्पण केले आणि चांगली गोलंदाजी केली. ब्रिस्बेन कसोटी जिंकणाऱ्या भारतीय संघात नटराजनही होता. त्यानंतर, त्याच्या कामगिरीमुळे खूश होत महिंद्रा अँड महिंद्रा मोटर्सचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी त्याला महिंद्रा थार हे वाहन भेट देण्याची घोषणा केली.

Advertisement

आता ही कार नटराजन याला मिळाली आहे. त्याने याची छायाचित्रेही सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत. आनंद महिंद्रा यांना त्याने रिटर्न गिफ्ट देखील दिले आहे. त्याने ब्रिस्बेन कसोटीची जर्सी आनंद महिंद्रा यांना दिली आहे.

Advertisement

anand mahindra on Twitter: “🙏🏽🙏🏽🙏🏽 Thank you Nattu. I will treasure the return present & wear it with pride… @Natarajan_91” / Twitter

Advertisement

नटराजन याने ट्विटरवर लिहिले की, ‘भारतासाठी क्रिकेट खेळणे हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे भाग्य आहे. मी अतिशय हलाखीच्या परिस्थीतीतून आलो. या प्रवासात खूप प्रेम आणि आपुलकी मिळाली, याचे मला आश्चर्य वाटते. महान लोकांच्या सहवासाने मला अशक्य गोष्टी शक्य करण्याचा मार्ग शोधण्यास मदत झाली. या गाडीबद्दल मी आनंद महिंद्रा यांच्याबद्दल कृतज्ञ आहे. त्यांनी माझा प्रवास समजून घेतला आणि माझे कौतुक केले, त्याबद्दल मी माझी ब्रिस्बेन सामन्यातील जर्सी पाठवत आहे’.

Advertisement

नटराजन तामिळनाडूच्या सालेम जिल्ह्यातील छोट्याशा खेड्यातून आला आहे. तो अत्यंत सामान्य कुटुंबातून वर आला आहे. अनेक संघर्षांना सामोरे जात त्याने क्रिकेटमध्ये आपले करिअर केले असून तमिळनाडूकडून तो सुरुवातीला खेळला. मग आयपीएलच्या माध्यमातून तो प्रसिद्ध झाला. यॉर्कर किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या नटराजनला प्रथम पंजाबने विकत घेतले होते. पण दुखापतीमुळे तो जास्त खेळू शकला नाही आणि संघाने त्याला सोडले.

Advertisement

आयपीएल २०२० मध्ये सनरायझर्स हैदराबादने त्याला खेळण्याची संधी दिली. तेव्हा शेवटच्या षटकात या खेळाडूने आपल्या यॉर्करद्वारे विरोधी गोलंदाजांचे चांगलेच हाल केले. त्याने १६ सामन्यात १६ बळी घेतले. या खेळाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली. वरुण चक्रवर्तीच्या दुखापतीमुळे त्याला सामना खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर जे घडले तो इतिहास सर्वांना माहित आहे.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply