Take a fresh look at your lifestyle.

आयपीएलपूर्वी क्रिकेटच्या नियमात झाला ‘तो’ बदल; वर्षभरापूर्वीचा झाला होता गदारोळ..!


मुंबई :

आयपीएल २०२१ सुरू होण्यापूर्वी क्रिकेटचे काही नियम बदलण्यात आले असून त्याअंतर्गत डीआरएस आणि तिसऱ्या पंचांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आयसीसीने शॉर्ट रन आणि एल.बी.डब्ल्यू संदर्भात नियमात बदल केले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील आयसीसी क्रिकेट समितीने हे निर्णय घेतले आहेत.

Advertisement

त्याअंतर्गत अंपायर्स कॉलबद्दल बरीच चर्चा झाली पण पुढेही तो सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि, शॉर्ट रनचा अंतिम निर्णयाचा अधिकार आता तिसऱ्या पंचांना देण्यात आला आहे. बैठकीनंतर अनिल कुंबळे म्हणाले की, क्रिकेट समितीमध्ये अंपायर्स कॉलबद्दल चांगली चर्चा झाली. जेव्हा डीआरएसची ओळख झाली तेव्हा चुका कमी करण्याचा आणि योग्य निर्णय घेण्याचा मानस होता. अशा परिस्थितीत पंचांच्या कॉलची महत्त्वपूर्ण भूमिका असते, म्हणून हे सुरू ठेवणे आवश्यक आहे.

Advertisement

क्रिकेट समितीने डीआरएसमधील तीन बदलांना मान्यता दिली आहे. त्याअंतर्गत, खेळाडू एलबीडब्ल्यू निर्णयाचा रिव्ह्यूघेण्यापूर्वी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे की नाही हे पंचांना विचारु शकतो. त्याच वेळी, शॉर्ट रनबाबत थर्ड अंपायर निर्णय घेईल, त्यात चूक आढळल्यास पुढचा चेंडू टाकण्यापूर्वी ती दुरुस्त केली जाईल. वास्तविक, शॉर्ट रनबाबत आयपीएलमध्ये गेल्या वर्षी खूप गदारोळ झाला होता.

Advertisement

दिल्ली कॅपिटलशी झालेल्या सामन्यात मैदानातील अंपायरने शॉर्ट रनचे कारण देत पंजाबची १ धावा कमी केली होती. पण ही धाव योग्य होती हे रिप्लेमध्ये उघडकीस आले. परंतु चुकीचा निर्णय देवूनही त्यात बदल करण्यात आला नाही, नंतर हा सामना बरोबरीत सुटला आणि दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये पंजाबचा पराभव केला. या पराभवाची शेवटी पंजाबला मोठी किंमत मोजावी लागली. त्यांनी प्लेऑफमधील स्थान थोड्या फरकाने गमावले. म्हणून शॉर्ट रनचा निर्णय तिसऱ्या पंचांना देण्याची मागणी करण्यात आली होती.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply