Take a fresh look at your lifestyle.

वर्ल्ड कप जिंकुन कोणावर उपकार नाही केलेत; पहा गौतम गंभीरने असे नेमके का म्हटलेय

दिल्ली :

Advertisement

वर्ल्ड कप २०११ मध्ये भारताच्या विजेतेपदासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने शुक्रवारी या विजेतेपदास १० वर्ष पूर्ण होत असल्याने एक विधान केलं आहे. तो म्हणाला की, मला हे समजत नाही की, लोक अजूनही याबद्दल उत्सुक का आहेत? वर्ल्ड कप जिंकुन आम्ही कोणावर उपकार केलेले नाहीत.

Advertisement

२ एप्रिल २०११ रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात गंभीर भारतीय विजयाच्या नायकांपैकी एक होता आणि त्याने ९७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाबाद अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला होता.

Advertisement

खासदार गंभीर याने पीटीआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, असे नाही की ही कालची गोष्ट आहे. किमान माझ्याबरोबर तसे होत नाही. आता या गोष्टीला १० वर्षे झाली आहेत. मी मागे वळून पाहणारा व्यक्ती नाही. अर्थात तो अभिमानास्पद क्षण होता परंतु आता वेळ आली आहे की, भारतीय क्रिकेट पुढे जाण्याची. कदाचित आम्हाला लवकरच पुढील विश्वचषक जिंकण्याची वेळ आली असेल. पण क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठ्या क्षणाबद्दल कोणी इतका उदासीन कसा असेल?

Advertisement

क्रिकेटच्या सर्व स्वरूपात २४२ सामन्यांत १० हजारहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा गंभीर म्हणाला, मी तसाच आहे. पूर्वीच्या विश्वचषकातील विजयाबद्दल लोकांनी फार उत्सुक असू नये अशा विचाराचा मी आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी बजावली आणि व्यावसायिक जबाबदारी पूर्ण केली. टी २० विश्वचषक २००७ च्या अंतिम सामन्यात भारताच्या विजयात सर्वाधिक धावा करणारा गौतम गंभीर म्हणाला की, २०११ मध्ये आम्ही असे काहीही केले नव्हते जे आम्हाला करायला नको होते. वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी आमची निवड झाली होती, आम्ही वर्ल्ड कप जिंकलाच पाहिजे. जेव्हा आमची निवड झाली तेव्हा आमची निवड केवळ स्पर्धेत खेळण्यासाठी झाली नव्हती, तर आम्ही जिंकण्यासाठीच मैदानात उतरलो होतो.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply