Take a fresh look at your lifestyle.

रेशन दुकानदाराची तक्रार करा एकाच क्लिकवर; ‘मेरा राशन’वर मिळणार ‘ही’ माहितीसुद्धा..!

मुंबई :

Advertisement

केंद्र सरकारच्या सार्वजनिक वितरण विभागाने मेरा राशन हे मोबाइल ॲप आणलेले आहे. याद्वारे आपण आपल्या नावावर मिळणाऱ्या अन्नधान्याच्या माहितीसह रेशन दुकानदाराची तक्रारही फ़क़्त एकाच क्लिकवर करू शकणारा आहोत.

Advertisement

एक देश, एक रेशनकार्ड योजनेअंतर्गत हे मोबाइल ॲप तयार केलेले आहे. या ॲपवर रेशनकार्ड धारकांना मंजूर असलेले धान्य, उचल करण्यात आलेले धान्य याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. सध्या हे ॲप सध्या हिंदी व इंग्रजी या दोन भाषेत उपलब्ध आहे. मराठीमध्ये अद्याप ते उपलब्ध नाही. 

Advertisement

रेशन दुकानदाराकडून लाभार्थीने घेतलेले धान्य याबाबत माहिती शिधा पत्रिकेचा क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला ही माहिती पाहता येते. शिधापत्रिका आधार सिडिंग झालेली असल्यास आधार क्रमांकही टाकून माहिती उपलब्ध होते.

Advertisement

सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत लाभ मिळण्यास संबंधीत रेशन कार्डधारक पात्र किंवा अपात्र, याबाबतही या ॲपवर माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याशिवाय रेशन दुकानदाराविषयीची तक्रारही दुकान क्रमांक व मोबाइल क्रमांक टाकून करता येईल. प्ले स्टोअवरून ॲप डाऊनलोड करता येणार आहे.

Advertisement

ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक : Mera Ration – Apps on Google Play

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply