Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : पुण्याबाबत झाला ‘तो’ महत्वाचा निर्णय; पहा काय आहेत नियम अटी..!

पुणे :

Advertisement

देशभरात कोरोना विषाणूची दुसरी लाट आलेली आहे. शुक्रवारी कोरोनाचे 81 हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तसेच 469 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर दिल्ली सरकारने आज आपत्कालीन बैठक बोलावली आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील पुण्यात 3 एप्रिलपासून 12 तासांच्या रात्रीच्या कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे.

Advertisement

कोरोनाची अनियंत्रित परिस्थिती पाहता पुणे शहरात कडक निर्बंध लागू झालेले आहेत. पुण्यात पुढील सात दिवस बार, हॉटेल आणि रेस्टॉरंट्स बंद राहतील. या व्यतिरिक्त 3 एप्रिलपासून 12 तासांचा नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

ANI on Twitter: “Bars, hotels, restaurants to remain closed for 7 days, only home delivery will be allowed. No public function, except funerals&weddings, will be allowed; max 20 people in funerals& 50 in weddings. Order to come into effect from tomorrow: Pune (Maharashtra) Divisional Commissioner” / Twitter

Advertisement

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली. सायंकाळी 6 ते सकाळी 6 या वेळेत पुण्यात नाईट कर्फ्यू सुरू राहील. पुढील शुक्रवारी कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात येईल. मग पुढील निर्देश दिले जातील. पुण्यात फक्त फूड होम डिलिव्हरीला परवानगी आहे. लग्न आणि अंत्यसंस्कार कार्यक्रम वगळता सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. केवळ 20 लोकांना अंत्यसंस्कारात आणि 50 जणांना विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याची परवानगी आहे.

Advertisement

नियमावली अशी :

Advertisement

सर्व हॉटेल, रेस्टाँरट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. मात्र पार्सल सेवा सुरु राहील.

Advertisement

मॉल आणि सिनेमा व धार्मिक स्थळं बंद ७ दिवसांसाठी बंद

Advertisement

PMPML बससेवा 7 दिवस बंद, केवळ अत्यावश्यक सेवा सुरु

Advertisement

आठवडे बाजारही बंद, लग्न, आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम होणार नाहीत

Advertisement

संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल, केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील

Advertisement

दिवसभर जमावबंदी, जिम सुरु राहणार, दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply