Take a fresh look at your lifestyle.

इमर्जन्सी मिटिंगवर मिटिंग..; आज होणार महत्वाचा निर्णय, ‘लॉकडाऊन’ला पर्याय काय असणार?

मुंबई :

Advertisement

कोविडची दुसरी लाट भारतात पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यापासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच लॉकडाऊनबाबत परस्परविरोधी मत मांडले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्यप्रदेश आणि दिल्लीमध्ये आज इमर्जन्सी मिटिंग होत आहेत. त्यातील निर्णयाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

कोविडची प्रकरणे वाढत आहेत. सध्या देशात सक्रिय प्रकरणांची संख्या सहा लाखांपेक्षा जास्त आहे. यापैकी केवळ गेल्या चार दिवसांत एक लाख वाढले आहेत. परिस्थिती नियंत्रणात येईल असे वाटत असतानाच राज्यांनी आपत्कालीन बैठक बोलविली आहे. यामध्ये मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. लॉकडाऊन होणार किंवा नाही, किंवा त्यावर पर्याय काय असणार याचे उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement

ANI_HindiNews on Twitter: “लखनऊ: उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी ​आदित्यनाथ ने राज्य में कोरोना की स्थिति पर अधिकारियों के साथ समीक्षा बैठक की। #COVID19 https://t.co/pL8LHbmSKo” / Twitter

Advertisement

मागील 24 तासांत अमेरिका, फ्रान्स आणि ब्राझील देशांमध्येच फक्त महाराष्ट्रापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. इतकी महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे दुर्दैवाने रुग्ण आढळण्याच्या बाबतीत महाराष्ट्र जगात चौथ्या क्रमांकावर आलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर आपत्कालीन बैठक बोलावली आहे. त्यात कोणता निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकारही अ‍ॅक्शन मोडमध्ये आलेले आहे. केंद्राने शुक्रवारी 11 राज्यांची बैठक बोलावली आहे. 11 राज्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांकडून परिस्थितीची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना देतील. ही 11 राज्ये अशी आहेत जिथे अलीकडील काळात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply