Take a fresh look at your lifestyle.

म्हणून मोहितेंसमोरच भाजप नेत्यांची तू तू मैं मै; मंगळवेढ्यात घडला ‘हा’ प्रकार

सोलापूर :

Advertisement

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची प्रक्रिया चालू असतानाच भाजपचा पक्षांतर्गत विसंवाद उघडकीस येण्यास सुरुवात झालेली आहे. आमदार रणजितसिंह मोहिते यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या समोरच मंगळवेढा येथील मंगल कार्यालयात भाजप नेत्यांची  तू तू मैं मै झाली आहे. याची चर्चा सध्या जिल्हाभर सुरू आहे. प्रतीक किल्लेदार यांना अध्यक्षपद देण्याचे नियुक्तिपत्रही तयार होते. त्याला स्वामी यांनी विरोध केल्याने हा प्रकार घडल्याची कार्यकर्त्यांत चर्चा आहे.

Advertisement

विधानसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भात गुरुवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत हा प्रकार घडला. आमदार रणजितसिंह मोहिते, आमदार प्रशांत परिचारक, उमेदवार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख उपस्थित होते. येथील माजी नगरसेवक अरुण किल्लेदार हे जिल्हाध्यक्ष देशमुख यांच्याशी पदाधिकारी निवडीविषयी चर्चा करीत असतानाच दोन कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. त्यामुळे काहीकाळ तिथे गोंधळ उडाला.

Advertisement

भाजपने तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बोलावलेली असतानाच आमदार प्रशांत परिचारक यांचे समर्थक यांच्या दोन समर्थकांमध्ये हा प्रकार घडला. निवडणूक प्रचाराच्या तोंडावर पक्षांतर्गत गटबाजीचे दर्शन घडल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी बोलावलेल्या बैठकीत लक्ष्मी दहिवडी येथील पप्पू स्वामी यांनी जिल्हाध्यक्ष देशमुख यांना निवडी तूर्त स्थगित ठेवण्याची विनंती केली. त्यावरून किल्लेदार व स्वामी यांच्यात वाद झाला. त्यानंतर किल्लेदार यांचे पुत्र प्रतीक किल्लेदार व स्वामी यांच्यात तू तू मैं मै झाले. तसेच दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले.
संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply