Take a fresh look at your lifestyle.

पंढरपूर पोटनिवडणूक : मोहितेंनाही मोठा झटका; आवताडेंच्या विरोधात आवताडेंचा शड्डू..!

सोलापूर :

Advertisement

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीने भगीरथ भालके यांना तर, भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. या दोघांना पक्षांतर्गत आणि मित्रपक्षांच्या बंडाळीचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते गटालाही यामुळे झटका बसला आहे.

Advertisement

आजतागायत राजकारणात मोहिते कुटुंबाचा शब्द प्रमाण मानून काम करणारे बबनराव आवताडे यांच्या गटाने दिवसभर बसून असलेल्या विजयसिंह मोहिते व आमदार रणजितसिंह मोहिते यांना कोणताही शब्द दिलाच नाही. खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मोहिते गटाने केलेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.

Advertisement

३० वर्षांपासून सहकार क्षेत्रावर बबनराव आवताडे यांचे वर्चस्व असून तालुक्यातील जवळपास सर्वच सहकारी संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. गावस्तरावरील त्यांच्या समर्थकांची फळी आहे. याचा फायदा होण्यासह सिद्धेश्वर आवताडे यांनी शहरासह ग्रामीण भागात बैठका घेत प्रचाराला सुरुवात केली आहे.

Advertisement

भाजपने दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. ते पक्षांतर्गत सहमतीचे उमेदवार असतानच त्यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सिद्धेश्वर अवताडे यांच्या उमेदवारीचा समाधान आवताडे यांना फटका बसण्याची भीती आहे. सिद्धेश्वर यांनी माघार घ्यावी, यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते बबनराव आवताडे यांची मोहिते गटाकडून मनधरणी केली जात आहे.

Advertisement

अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे यांनी म्हटले आहे की, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते यांनी निवडणुकीत माघार घेण्याची विनंती केली. मात्र, मी निवडणूक लढविण्यावर ठाम आहे. आता माघार घेणार नाही. तालुक्यातील पाणीप्रश्न, राेजगार निर्मितीसाठी मी ही निवडणूक लढविणार आहे.

Advertisement

सिद्धेश्वर आवताडे यांच्या अर्ज माघारीवर भाजपच्या प्रचाराचे धोरण ठरणार आहे. जर, त्यांनी अर्ज ठेवला तर भाजपला हे प्रकरण जड जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे यावर समाधान अवताडे कोणता मार्ग काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply