Take a fresh look at your lifestyle.

सोलापूरचा ‘तो’ साखर कारखाना रोहित पवारांच्या कंपनीकडे; भाडेपट्टा ठराव मंजूर

सोलापूर :

Advertisement

करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो (Baramati Agro) कंपनीतर्फे चालवला जाणार आहे. कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुमताने या ठरावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे.

Advertisement

कोरोनामुळे ४९ वी सर्वसाधारण सभा आॅनलाइन पध्दतीने घेण्यात आली. यासभेला ६१२ सदस्य उपस्थित होते. या सर्वसाधारण सभेत सभासद, वाहतूकदार, कर्मचारी यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आल्याची माहिती चेअरमन धनंजय डोंगरे यांनी दिली.

Advertisement

या सर्वसाधारण सभेत आदिनाथ कारखाना बारामती अॅग्रोस भाडेपट्टा करारावर देण्यासंदर्भात झालेल्या ठरावावर ९८ % सभासदांनी मतदान केले. त्यामुळे हा कारखाना अधिकृतरीत्या बारामती अॅग्रोकडे जाण्याचा अडथळा आता संपला आहे.

Advertisement

श्रीआदिनाथ सहकारी साखर कारखाना २५ वर्षांसाठी भाडेपट्टा करारावर देण्याच्या शिखर बँकेच्या ठरावाला हिरवा कंदील मिळाला मिळाला आहे. यावेळी कार्यकारी संचालक अरुण बागनवर यांनी आभार व्यक्त केले. मार्गदर्शक संचालिका रश्मी बागल, नानासाहेब लोकरे, पांडुरंग जाधव, प्रकाश पाटील, अविनाश वळेकर, नामदेव भोगे, मंदा लक्ष्मण गोडगे, भामाबाई दिलीप केकाण, सचिन पांढरे, आशिष गायकवाड, स्मिता पवार आदि उपस्थित होते.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply