Take a fresh look at your lifestyle.

आरोग्य धोरण जाहीर; पहा कोणाला मिळणार मोफत उपचार, ‘ते’ आजार मदतीच्या बाहेरच

दिल्ली :

Advertisement

दुर्मिळ अाजारांसाठीचे बहुप्रतीक्षित असे नॅशनल पाॅलिसी फाॅर रेअर डिसीज – २०२१ हे धाेरण अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जाहीर केले आहे. दिल्ली हाय कोर्टाने दिलेल्या आदेशाने जाग आलेल्या केंद्र सरकारने हे धोरण जाहीर करताना काही आजार मात्र मदतीच्या बाहेर ठेवले आहेत.

Advertisement

याअंतर्गत एम्स (दिल्ली), मौलाना आझाद मेडिकल कॉलेज (दिल्ली), संजय गांधी पीजी इन्स्टिट्यूट (लखनऊ), पीजी इन्स्टिट्यूट (चंदिगड), डीएनए फिंगरप्रिंटिंग वडायग्नोस्टिक्स (हैदराबाद), किंग एडवर्ड मेडिकल हॉस्पिटल (मुंबई), पीजी मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (कोलकाता), सेंटर फाॅर ह्युमन जेनेटिक्स (बेंगलोर) या रुग्णालयांना दुर्मिळ आजारांसाठी उत्कृष्टता केंद्रे म्हणून अधिसूचित केले जाणार आहे.

Advertisement

काही दुर्मिळ अाजारांच्या उपचारासाठी एकरकमी २० लाख रुपयांची मदत देण्याची तरतूद आहे. केंद्र सरकारने यासाठी १५ लाख रुपये देण्याचे धोरण ठेवले होते. मात्र, न्यायालयाने ते २० लाख करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्याचाही लाभ नागरिकांना मिळणार आहे.

Advertisement

याद्वारे  गाैसर विकार, हर्लर सिंड्रोम, हंटर सिंड्रोम, पोम्प विकार, फॅब्री विकार, सिस्टिक फायब्रोसिस, मस्क्युलर डिस्ट्रॉफी व स्पायनल मस्क्युलर एट्रॉपी सारख्या गंभीर दुर्मिळ अाजारांसाठी क्राऊड फंडिंग प्लॅटफाॅर्मच्या माध्यमातून निधी उभारून उपचार करण्याची तरतूद ठेवण्यात अाली अाहे. महागडे उपचार असलेल्या या दुर्मिळ अाजाराच्या धाेरणामुळे रुग्णांच्या पदरी निराशा पडली अाहे.

Advertisement

या धोरणामधील महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
  • बीपीएल श्रेणीची बंधनकारक पात्रताही संपवण्यात अाली आहे
  • लाइसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर, म्युकोपाॅलिसॅकेरायडोसिस, ऑस्टियोपेट्रोसिस, ग्लायकोजेन स्टोरेज डिसऑर्डर, मॅपल सिरप मूत्र रोग विकार यांचा पहिल्या श्रेणीमध्ये समावेश आहे. यात एकदा स्टेम सेल किंवा अवयव (यकृत किंवा मूत्रपिंड) प्रत्यारोपणाद्वारे उपचार केला जाऊ शकतो.
  • विशिष्ट प्रकारचा अाहार, हार्मोन्स किंवा विशेष औषधांद्वारे आणि आयुष्यभर किंवा दीर्घ काळपर्यंत उपचार सुरू राहणाऱ्या (फिनाइल्केटोनुरिया, होमोसिस्टीनुरिया, युरिया सायकल एन्झाइम दोष) आजार व रोगांना द्वितीय श्रेणीमध्ये टाकलेले आहे.
  • गॉसर विकार, हर्लर सिंड्रोम, हंटर सिंड्रोम, पोम्प विकार, फॅब्रिक विकार, सिस्टिक फायब्रोसिस, मस्क्युलर डिस्ट्राॅफी आणि स्पायनल मस्क्युलर एट्राॅपी आदि आजारांना तृतीय श्रेणीमध्ये समाविष्ट केलेले आहे.
  • पहिल्या श्रेणीतील रुग्णांच्या उपचारासाठी २० लाख रुपयांच्या एकरकमी मदतीची तरतूद अाहे. 
  • दुसऱ्या श्रेणीसाठी राज्य सरकारकडून मदत करण्यावर विचार करण्याबाबत शिफारस केली अाहे.
  • तर, तिसऱ्या श्रेणीत अाजारासाठी क्राऊड फंडिंगची पद्धत सुचविली अाहे.

संपादन : संतोष वाघ

Advertisement

For Info https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1602358

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply