Take a fresh look at your lifestyle.

म्हणून झालीय सोन्या-चांदीमध्ये वाढ; पहा काय चालू आहे मार्केट ट्रेंड

दिल्ली :

Advertisement

गुरुवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव आज दहा ग्रॅमला 881 रुपयांनी वाढून 44,701 रुपये झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते सोने काल  43,820 रुपये / 10 ग्रॅम होते. तर चांदी 1,071 रुपयांनी महाग झाली आहे.

Advertisement

चांदीचे भाव आता 63,256 रुपये प्रतिकिलो झाले आहेत. काल चांदीचे भाव 62,185 रुपये होते. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रतिऔंस 1,719 डॉलर, तर चांदी प्रतिऔंस 24.48 डॉलर होती. गेल्या वर्षी सोन्याच्या मागणीत तब्बल 35 टक्क्यांहून अधिक घट झाली होती.

Advertisement

2020 मध्ये देशातील सोन्याची मागणी 35 टक्क्यांपेक्षा घटून  446.4 टनांवर गेली होती. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (डब्ल्यूजीसी) एका अहवालात ही माहिती दिली आहे. डब्ल्यूजीसीच्या 2020 च्या सोन्याच्या मागणीबाबतच्या अहवालात कोरोना विषाणूमुळे अंमलात आलेल्या लॉकडाऊन आणि मौल्यवान धातूंची किंमत उच्चांकापर्यंत पोहोचली असल्याने असे झाल्याचे म्हटलेले आहे. मात्र, सध्या करोनावर येत असलेल्या लसच्या पार्श्वभूमीवर सामान्य परिस्थिती झाल्यास सोन्याच्या मागणीत वाढ होऊ शकते.

Advertisement

चालू आर्थिक वर्ष म्हणजे 2020-21 च्या पहिल्या 11 महिन्यांत सोन्याची आयात 3.3  टक्क्यांनी घसरून 26.11 अब्ज डॉलरवर गेली. विशेष म्हणजे सोन्याच्या आयातीचा परिणाम देशाच्या चालू खात्यातील तूट (सीएडी) यावर होतो. गेल्या आर्थिक वर्षात याच काळात सोन्याची आयात 27 अरब डॉलर इतकी झाली होती. वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सोन्याच्या आयातीतील कपातीमुळे देशाची व्यापार तूट कमी होण्यास मदत झाली आहे.

Advertisement

संपादन : राम बोराटे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply