Take a fresh look at your lifestyle.

भाजपने केली ‘ती’ महत्वाची मागणी; पहा नेमके काय म्हटलेय दरेकरांनी

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्रातील वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा विरोधी पक्ष असलेला भाजप सक्रीय झाला आहे. मुंबईतील प्रदेश भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

Advertisement

दरेकर यांनी म्हटले की, वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेतील त्रुटी समोर आणणाऱ्या घटना रोज समोर येत आहेत. नाशिकमध्ये रुग्णालयात बेड न मिळाल्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन करणाऱ्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.  नाशिकच्या दौऱ्यात आयुक्तांची भेट घेऊन बेडस, वेंटीलेटर  उपलब्ध नाहीत, हे लक्षात आणून दिले होते. दौऱ्यावरून परत आल्यानंतर मुख्यमंत्र्यानासुद्धा याची कल्पना दिली होती.  परंतु, सांगूनही हे सरकार, प्रशासन जागं होत नाही.  त्यामुळे या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध व खुद्द सरकारविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.       

Advertisement

केंद्र सरकारने कोरोना काळात अनेक उपाययोजना केल्या. सर्वसामान्यांना मदत केली.  त्यामुळेच देश पातळीवर केंद्र सरकार कोरोना रोखण्यात यशस्वी ठरलं. केंद्र सरकारने सर्वपरी राज्याला मदत केल्यानंतरही महाविकास आघाडी सरकार नियोजन करण्यात अपयशी ठरलं आहे. केंद्राने राज्याला दिलेल्या व्हेंटिलेटरपैकी ४०० व्हेंटिलेटर प्रशिक्षित तंत्रज्ञ नाहीत म्हणून धूळ खात पडले आहेत. राज्यातील सरकार जनतेच्या जीविताच रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला, गृह विभागाला आमची विनंती आहे की, त्यांनी राज्यात लक्ष घालावे आणि कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात.  कारण, सर्वसामान्य लोकांकडे, महाराष्ट्राकडे राज्याच्या सरकारचे लक्ष राहिलेलं नाही, फक्त सत्ता टिकवणे हेच त्यांचे लक्ष आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लक्ष घालून मोठ्या प्रमाणावर मदत करावी, अशी मागणीही शेवटी दरेकर यांनी केली.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply