Take a fresh look at your lifestyle.

एप्रिल फुल नव्हे तर कुल करा; पहा नेमका काय दिलाय रोहित पवारांनी संदेश

अहमदनगर :

Advertisement

आज एप्रिल फुल हा दिवस जोरात साजरा केला जात आहे. अशावेळी एकमेकांना फसवून मजाकद्वारे आनंद मिळवला जात असतानाच एप्रिल फुल नव्हे तर कुल करण्याचा संदेश दिला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही असाच संदेश दिला आहे.

Advertisement

त्यांनी ट्विटरवर दोन फोटो शेअर केले आहेत. पुढे म्हटले आहे की, आज १ एप्रिल असल्याने एखाद्याला #AprilFool करण्यासाठी खोटं बोलण्याऐवजी किंवा अफवा पसरवण्याऐवजी कर्जतमधील तात्यासाहेब क्षीरसागर आणि संतोष शिंदे यांनी तेलाच्या रिकाम्या डब्यांमध्ये पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करून त्यांचा एप्रिल ‘कूल’ केला. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं उदघाटन केलं.

Advertisement

एकूणच सध्या वाढत्या उन्हाळ्यात पर्यावरण रक्षणाच्या मुद्द्याची जाणीव सर्वांना होण्यास सुरुवात झाली आहे. रोहित पवार यांनीही तरुणांच्या या उपक्रमाचे स्वागत करताना सर्वांनी या अभियानात सहभागी होण्याचा संदेश दिला आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

Rohit Pawar on Twitter: “आज १ एप्रिल असल्याने एखाद्याला #AprilFool करण्यासाठी खोटं बोलण्याऐवजी किंवा अफवा पसरवण्याऐवजी कर्जतमधील तात्यासाहेब क्षीरसागर आणि संतोष शिंदे यांनी तेलाच्या रिकाम्या डब्यांमध्ये पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करून त्यांचा एप्रिल ‘कूल’ केला. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं उदघाटन केलं. https://t.co/t1xHabWtyc” / Twitter

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply