Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. महाराष्ट्रातही प्रगती का हायवे; पहा गडकरींनी कोणत्या रस्त्यांना दिलेय कोट्यावधींचे एप्रिल गिफ्ट..!

पुणे :

Advertisement

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशाला एक एप्रिल रोजी महत्वाचे गिफ्ट दिले आहे. हे प्रकरण एप्रिल फुल यामधील नसून चक्क देशभरात ‘प्रगती का हायवे’ करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. यात महाराष्ट्र राज्यालाही भरभरून देण्यात आलेले आहे.

Advertisement

 राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या कामांविषयी महत्त्वाची घोषणा करताना गडकरी यांनी कोट्यावधींचा निधी जाहीर केला आहे. यात महाराष्ट्र राज्यातील विविध रस्तेकामांसाठी तब्बल 2780 कोटी रुपयांचा दमदार असा निधी मिळाला आहे.

Advertisement

प्रगती का हायवे #PragatiKaHighway हा हॅशटॅग देऊन गडकरी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून सर्व महामार्गावर केल्या जाणाऱ्या कामांची माहिती दिली आहे. याप्रकरणाचे काही व्हिडिओही त्यांनी शेअर केले आहेत. त्यामुळे आज गडकरी पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आहेत.

Advertisement

Nitin Gadkari on Twitter: “Delhi Meerut Expressway has now been completed & opened to traffic. We have full filled our promise of reducing travel time between Delhi – Meerut from 2.5 hours to 45 minutes. #PragatiKaHighway https://t.co/OgFyOJ5QLs” / Twitter

Advertisement

महाराष्ट्रातील रस्ते विकासासाठी मिळणारा निधी असा :

Advertisement
  • आमगाव-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग 543 साठी 239 कोटी 24 लाख रुपये
  • जळगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्ग 753 च्या विस्तारीकरणासाठी 252 कोटी रुपये
  • राष्ट्रीय महामार्ग 752 आयवरील वातूर ते चारथाना दरम्यान असलेल्या रस्ते कामासाठी 228 कोटी रुपये
  • गडचिरोली तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 353 सीवरील 262 किमी ते 321 किमीच्या अंतरामध्ये 16 लहान मोठे पूल बांधले जातील. यासाठी 282 कोटी रुपयांचा निधी
  • तारीरी- गगनबावडा – कोल्हापूर या राष्ट्रीय महारमार्ग 166 जीवरील रस्ते कामासाठी 167 कोटी रुपये
  • तिरोरा ते गोंदियादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 753 च्या दोन पदरी रस्त्यासाठी 282 कोटी रुपये
  • नागपुरातील आरटीओ चौक ते नागपूर विद्यापीठ कॅम्पस उड्डाणपूल आणि राष्ट्रीय महामार्ग 53 वर वाडी / एमआयडीसी जंक्शन येथे चार पदरी उड्डाण पूल बांधण्यासाठी एकूण 478 कोटी 83 लाखांचा निधी
  • राष्ट्रीय महामार्ग 361 एफच्या परळी गंगाखेडदरम्यानच्या कामासाठी 222 कोटी 44 लाख रुपये
  • तिरोरा गोंदियादरम्यानच्या राज्य महामार्गाच्या कामासाठी 288.13 कोटी रुपये मंजूर, तर राष्ट्रीय महामार्ग 753 अंतर्गत 28.2 किमीचा नवीन रस्त्यांचे बांधकाम
  • नांदेड जिल्ह्यातील येसगीमध्ये मांजरा नदीवर पूल बांधण्यासाठी 188 कोटी 69 लाख रुपये मंजूर केले आहेत. हा पूल राष्ट्रीय महामार्ग 63 चा भाग असणार

संपादन : संतोष वाघ  

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply