Take a fresh look at your lifestyle.

वाझे प्रकरण : अखेर जिलेटीन कांड्याबाबतची माहिती आलीच पुढे; ‘त्या’ कंपनीलाही घेतले जाणार रडारवर..!

मुंबई :

Advertisement

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील परिसरात जिलेटीन कांड्या आणि धमकीचे पत्र टाकून एक कार उभी करण्यात आली होती. त्यातील जिलेटीनच्या कांड्या खरेदीबाबतची माहिती अखेर पुढे आली आहे. स्कॉर्पियोमधून जप्त केलेल्या जिलेटिनच्या 20 कांड्या याप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी सचिन वाझे यानेच खरेदी केल्या असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) यांनी याची माहिती दिली आहे.  या कांड्या नागपूरच्या ‘सोलर इंडस्ट्रीज’ नावाच्या कंपनीत तयार झालेल्या आहे. मात्र, वाझे याने त्या कुठून आणि कशा पद्धतीने खरेदी केल्या याची कोणतीही माहिती अजूनही तपास संस्थेने दिलेली नाही. कांड्यावर नोंदलेल्या नावाच्या आधारे तापसी अधिकारी आता याप्रकरणी कंपनीकडे संपर्क करणार आहे.

Advertisement

जिलेटीन कांड्याच्या प्रत्येक बॉक्सवर एक विशेष क्यूआर कोड असतो. त्याचे सर्व रेकॉर्ड संबंधित कंपनीजवळ असते. त्यामुळे आता याद्वारे याचा नेमका फ्लो स्पष्ट होणार आहे. एकूणच आतापर्यंत तपास संस्थेने भरमसाठ माहिती जाहीर केलेली असतानाही मास्टरमाइंड कोण, हाच प्रश्न अनुत्तरीत आहेत. हा प्रश्न कधी सुटणार याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

दरम्यान, अँटिलिया प्रकरणातील 8 वी कार जप्त करण्यात आलेली आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ  

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply