Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक.. स्मार्टफोनअभावी शिक्षण रखडल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या; पहा कुठे घडली दुर्दैवी घटना

नागपूर :

Advertisement

सध्या करोना लॉकडाऊनमुळे शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. परिणामी ऑनलाईन शिक्षण चालू आहे. मात्र, गरिबांना हे ऑनलाईन शिक्षण म्हणजे वेगळीच डोकेदुखी बनली आहे. चांगला मोबाईल घेण्यासह त्याला इंटरनेटसाठीही मोठा खर्च होत असल्याने अनेक गरीब विद्यार्थ्यांची परवड होत आहे. अशाच दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना अकोला शहरात घडली आहे.

Advertisement

भीमनगरातील इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या पायल मोहन गवई (१५ वर्ष) हिने मंगळवारी सायंकाळी आत्महत्या केली आहे. ‘मोबाइलपायी माया पायलचा जीव गेला, आता मायी लाडाची पोर डोयानं दिसणार नाही…’ असं सांगत असताना हंबरडा फोडणाऱ्या पायलच्या मातेचा आक्रोश सर्वांच्या काळजाला छेदत आहे.

Advertisement

दिव्य मराठी वृत्तपत्राने यावर बातमी केली आहे. त्यात ‘लॉकडाऊनमुळे हातात पैका नाही… माया पोरीची ट्यूशन बंद झाली… शाळेचे मास्तर बी ऑनलाइन शिकवायचे…. पण घरी मोठा मोबाइल नाई… तिनं अभ्यासाचं टेन्शन घेतलं. म्हणे… आई माया मैत्रिणी १० वी पास होतीन अन् मी नापास होईन… मले ऑनलाइन वर्गासाठी मोबाइल फाेन घेऊन दे नं… घरात दोन टाईम खायले नाही… तिले मोबाइल कसा घेऊन देऊ? तरी मी सांगो, नापास झाली तरी काई होतं नाही; तरीपण तिनं नाही एेकलं…’ असं तिच्या कुटुंबीयांनी म्हटलेले आहे.

Advertisement

कोरोनामुळे वर्षभर शाळेचे वर्ग ऑनलाइन सुरू झाले. मात्र घरी स्मार्टफोन नसल्याने तिला ते शक्य झाले नाही. २३ तारखेपासून बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. यामुळे शाळेकडून सराव परीक्षा घेतली जात आहे. मात्र, स्मार्ट फोन नसल्यामुळे पायलला सराव परीक्षाच देता आली नाही. तिने वारंवार घरच्यांना मोबाइल घेण्याचे सांगितले. मात्र, मोबाईल न मिळाल्याने खचलेल्या पायलने आपले जीवन संपवले आहे.

Advertisement

पोलिस अधिकारी बनायचे स्वप्न असलेली आपली मैत्रीण गेल्याची भावना तिच्या मैत्रिणींनी व्यक्त केली आहे. अशा पद्धतीने गरिबीच्या चक्रव्युहात अडकलेल्या पायलला फ़क़्त स्मार्टफोन घेण्याची ऐपत नसल्याने जीवनयात्रा संपवावी लागली आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना महाविकास आघाडी सरकारने स्मार्टफोन देण्याची मागणी यानिमित्ताने होत आहे. त्याला राज्य सरकार कसा प्रतिसाद देते याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ  

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply