Take a fresh look at your lifestyle.

तरच एफआरपीचा भाव देणे शक्य; आमदार शिंदेंनी सांगितले महत्वाचे गणित..!

सोलापूर :

Advertisement

ऊसदरासह कर्ज व त्यावरील व्याज यामुळे कारखाने अडचणीत आलेले आहेत. अशावेळी सगळेच गणित योग्य पद्धतीने बसवण्यासाठी आणि उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत दर (एफआरपी) देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेला प्रतिक्विंटल ३५०० रुपये आधारभूत भाव निश्चित करण्याची गरज असल्याची माहिती विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे.

Advertisement

कारखान्याची २१ वी ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ३० मार्च रोजी सकाळी ११ वाजता कारखाना कार्यस्थळावर झाली. यावेळी ते बोलत होते. उपाध्यक्ष वामन ऊबाळे, प्रभारी कार्यकारी संचालक सुहास यादव, संचालक सुरेश बागल, वेताळ जाधव, रमेश येवले-पाटील, विष्णू हुंबे, लक्ष्मण खूपसे, पोपट चव्हाण, शिवाजी डोके, पांडुरंग घाडगे, पोपट गायकवाड, सुरेश बागल, सचिन देशमुख, सिंधु नागटिळक, लाला मोरे, सुभाष नागटिळक आदि यावेळी उपस्थित होते.

Advertisement

मागील हंगामात केंद्र शासनाने साखरेचे उत्पादन जास्त झाल्याने निर्यात साखरेस अनुदान दिल्याने कारखान्याना एफआरपी देणे शक्य झाले. मात्र, तरीही अनुदानाचे ७४ कोटी रुपये कारखान्यांना येणे बाकी आहेत. कारखानदारी अत्यंत अडचणीतून मार्गक्रमण करीत असल्याने ते पैसे त्ताडीने मिळणे आवश्यक असल्याचे आमदार शिंदे यांनी म्हटले आहे.

Advertisement

चालू गळीत हंगामात शेतकऱ्यांना प्रतिटन दोन हजार रुपये ॲडव्हान्स देण्यासह उसाचे सर्व बिल दिले आहे. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या साखर निर्यात कोट्याप्रमाणे साखर विक्री झालेली आहे. आणखी ६ लाख पोती साखर निर्यात करण्याचा प्रयत्न असून पुढील हंगामात दररोज तीन लाख लिटर इथेनॉल तयार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply