Take a fresh look at your lifestyle.

आत्महत्या प्रकरणाला तस्करीची किनार; पहा नेमके काय म्हटलेय आंबेडकरांनी

नागपूर :

Advertisement

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून अात्महत्या केल्याच्या दुर्दैवी प्रकरणाने अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला आहे. आतापर्यंत यातील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. याबाबत स्थानिक पातळीवर उलटसुलट चर्चाही आहेत. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीने अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

Advertisement

आंबेडकर यांनी म्हटले आहे की, चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा संबंध वाघांची शिकार व सागवान तस्करीशी आहे. वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.धैर्यवर्धन फुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, प्रसिद्धी प्रमुख डॉ.प्रसन्नजीत गवई, िज.प. गट नेते ज्ञानेश्वर सुलताने, चंद्रशेखर पांडे गुरुजी, शंकरराव इंगळे, अाकाश सिरसाट, पराग गवई, राम गव्हाणकर आदी त्या पत्रकार परिषदेत हजर होते.

Advertisement

आंबेडकर यांनी या प्रकरणाला वेगळे वळण आणि किनार असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. त्यांच्या या आरोपामुळे पुन्हा एकदा या प्रकरणाची उत्सुकता वाढली आहे. आंबेडकर म्हणाले की, चव्हाण यांच्यावर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाल्यावर त्यांना जामीनही मिळाला हाेता. मात्र, या प्रकरणात नेमके कोण हाेते, त्यांचा वनक्षेत्राशी आणि इतर गोष्टींशी नेमका काय संबंध आहे, अशा सर्वच बाबींची सखाेल निष्पक्ष चाैकशी व्हावी.

Advertisement

मेळघाटमध्ये सक्रिय असलेल्या बाहेरील अशासकीय स्वयंसेवी संस्थांकडे प्रचंड संपत्तीवरही आंबेडकर यांनी बोट ठेवले आहे. त्यांनी म्हटले आहे की, या संस्थांकडे अादिवासींच्या जमिनी किती अाहेत याचीही चौकशी व्हावी. तसेच दीपाली चव्हाणने अनेक पत्र वरिष्ठांना पाठवून कारवाईची मागणी केली होती. तिने काेणाच्या विरोधात चौकशी करण्याची मागणी केली होती, याची सखाेल व निष्पक्ष चाैकशी हाेणे अावश्यक अाहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply