Take a fresh look at your lifestyle.

राउतांना झटका; मुख्य प्रवक्तेपदी सावंत, ‘ते’ नडले खासदार राउत यांना..?

मुंबई :

Advertisement

शिवसेना हा वेगळ्या धाटणीचा पक्ष आहे. तिथे वेगळी भूमिका कधी आणि कशी घ्यावी यालाही मर्यादा आणि स्वातंत्र्य आहे. त्यातच गल्लत केल्याचा फटका पत्रकार-खासदार संजय राउत यांना बसला आहे. महाविकास आघाडीला एकत्र आणणारे राउत अनेकदा ‘वेगळी’च भूमिका घेताना दिसल्याने आता त्यांना एका समांतर शक्तीकेंद्र तयार करण्यात आलेले आहे.

Advertisement

मंगळवारी शिवसेनेने आपल्या १६ प्रवक्त्यांची यादी प्रसिद्ध करताना त्यात १४ प्रवक्ते असून प्रथमच दोन मुख्य प्रवक्ते नेमले. नुकतेच सप्टेंबर २०२० मध्ये शिवसेनेने मुख्य प्रवक्तेपद निर्माण करून राऊत यांच्याकडे ही जबाबदारी दिली होती. मात्र, आता दोन मुख्य प्रवक्ते नेमण्यात आलेले आहेत.

Advertisement

संकटमोचक व खासदार राऊत यांचे पक्षनेतृत्वाने पंख छाटले असल्याची चर्चा त्यामुळे मुंबईत आहे. समांतर असे पक्षात मुख्य प्रवक्तेपद निर्माण करून ते खासदार अरविंद सावंत यांच्याकडे देण्यात आल्याने ही चर्चा सुरू झालेली आहे. एकूणच अनेकदा वेगळी भूमिका घेतल्याने राऊत यांना पक्षाने हा झटका दिल्याचे दिव्य मराठी वा वृत्तपत्राच्या बातमीतही म्हटलेले आहे.

Advertisement

अँटिलिया प्रकरणानंतर डॅमेज कंट्रोलची यंत्रणा सरकारकडे नव्हती. आयपीएस अधिकाऱ्यांची सरकारविरोधी कृत्ये माहीत होऊनही त्यांना मोक्याच्या जागी कसे काय ठेवले, यावर राउत यांनी जाहीर भाष्य केले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही राउत यांनी टीका केली होती. शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीसंदर्भात राऊत यांनी परस्पर खुलासा करून टाकला होता.

Advertisement

शिवसेना प्रवक्त्यांची टीम अशी :

Advertisement
  • मुख्य प्रवक्ते : खासदार संजय राउत आणि खासदार अरविंद सावंत
  • प्रवक्ते : उपनेते सचिन आहेर, आमदार सुनील प्रभू, प्रताप सरनाईक, भास्कर जाधव, अंबादास दानवे, मनीषा कायंदे, किशोरी पेडणेकर, शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ, किशोर कान्हेरे, संजना घाडी आणि आनंद दुबे 

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply