Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. म्हणून सोयाबीन गेले की थेट 6 हजारांवर; ‘त्यामुळे’ झालीय भाववाढ, पहा मार्केट अपडेट

पुणे :

Advertisement

सध्या तेलाचे भाव उच्चांकी असल्याने तेलबियांचे भावही वधारले आहेत. जागतिक बाजारात तेलबियांचा तुटवडा आणि तुलनेने मागणीच्या प्रमाणात कमी असलेली आवक यामुळे सोयाबीन पिकाचे भाव पहिल्यांदाच थेट 6 हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत.

Advertisement

आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाच्या वाढत्या किमतीमुळे देशातील बाजारात सर्व खाद्यतेलांच्या भावात वाढ झालेली आहे. सामान्य जनतेच्या आवाक्याच्या बाहेर तेलाचे भाव गेले आहेत. परिणामी सर्वाधिक मागणी असलेल्या सोयाबीन तेलाच्या तेलबियांचा भाव एनसीडीएक्सवर बुधवारी ६,०३२ रुपये प्रतिक्विंटलवर गेला आहे.

Advertisement

र्वात मोठी बाजारपेठ इंदूरमध्येही (मध्यप्रदेश) ५९०० रुपयापर्यंत भाव आहेत. सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे संचालक बी. व्ही. मेहता यांनी याबाबत म्हटले आहे की, सोयाबीन तेलाच्या किमती बऱ्याच वाढल्या आहेत. सोया मिलची मागणी वाढली आहे आणि पीक अंदाजापेक्षा कमी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनची भाववाढ शक्य आहे.

Advertisement

भारतात खाद्य तेलाचा वार्षिक वापर सुमारे २५० लाख टन असून केवळ ९०-१०० लाख टन खाद्यतेलाचे उत्पादन होते. परिणामी कमीत कमी १५० लाख टन आयात करावी लागते. या आयातीमध्ये पाम तेल सर्वाधिक मागवले जाते. याचे सर्वात मोठे उत्प्दक आणि निर्यातदार असलेल्या इंडोनेशिया आणि मलेशियाने निर्यात शुल्क जवळपास दुप्पट केल्याचा फटका अवघ्या जगाला बसला आहे.

Advertisement

आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाच्या वाढत्या किमतीमुळे देशातील बाजारात सर्व खाद्यतेलांच्या भावात वाढ हे यामागचे सर्वात मोठे कारण असून सध्याचा ट्रेंड लक्षात घेता आणखी काही कालावधीसाठी अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे.

Advertisement

पहा महाराष्ट्र राज्यातील कालचे (दि. 31 मार्च 2021) रोजीचे बाजारभाव :

Advertisement
मार्केटकमीतकमी भावजास्तीतजास्त भावसरासरी भाव
औरंगाबाद500052005100
संगमनेर565156515651
श्रीरामपूर500056005400
तुळजापूर560056005600
भोकर454556135080
मुरुम520052005200
काटोल462558755260

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply