Take a fresh look at your lifestyle.

वाझे प्रकरण : ‘मास्टरमाइंड’च्या शोधासाठी NIA सक्रीय; पहा नेमकी कोणती माहिती दिलीय न्यायालयात

मुंबई :

Advertisement

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांची कार ठेवण्यासह कराचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याला अटक झालेली आहे. दरम्यान, याप्रकरणाचे धागेदोरे नेमके कोणत्या ‘मास्टरमाइंड’पर्यंत जातात याचा आता राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) तपास सुरू केला आहे.

Advertisement

मंगळवारी विशेष न्यायालयात NIA ने माहिती दिली की, हिरेन यांच्या हत्येचे कटकारस्थान रचताना वाझे आणि त्याचा साथीदार बडतर्फ पोलिस विनायक शिंदे हे दोघेही हजर होते. वाझेने तेथूनच आपल्या मोबाइलवरून ‘मास्टरमाइंड’ला फोन लावला होता. दरम्यान, या ‘मास्टरमाइंड’चे नाव काही अजूनही तपास संस्थेने सांगितलेले नाही.

Advertisement

हत्येचा कट कुणी रचला हे न्यायालयाततपास संस्थेने सांगितले नाही. मात्र, त्येमागचे कारण आणि त्याचबरोबर हे षड‌्यंत्र रचण्यामागे कुणाचा हात आहे त्या मास्टरमाइंडचे रहस्य लवकरच उलगडेल, असे सांगून त्यांनी आपण ‘मास्टरमाइंड’पर्यंत पोहोचण्यात नक्कीच यशस्वी होणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

Advertisement

दरम्यान, विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. शिंत्रे यांनी हिरेन हत्याकांडातील सहभागी विनायक शिंदे आणि त्याचा साथीदार नरेश गौर यांची कोठडी ७ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ २५ फेब्रुवारी रोजी एका एसयूव्ही कारमध्ये स्फोटके सापडली होती. ही एसयूव्ही ठाण्याचे व्यापारी मनसुख हिरेन यांची होती. ५ मार्च रोजी हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा-रेतीबंदर खाडीत आढळला होता. त्यांच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणात हात असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र एटीएसने शिंदे व गौर यांना अटक केली होती.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply