Take a fresh look at your lifestyle.

सनरायझर्स हैदराबादकडून मिशेल मार्शऐवजी खेळणार ‘हा’ खेळाडू..!

मुंबई :

Advertisement

आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादने इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय याला अष्टपैलू मिशेल मार्शच्या जागी घेतले आहे. गेल्या महिन्यात आयपीएलच्या लिलावात रॉयला विकत घेण्यात कोणत्याही संघाला रस नव्हता. जेसन रॉयने अलीकडेच भारताविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी २० मालिकेत चांगली कामगिरी केली. वनडे मालिकेच्या ३ सामन्यात रॉयने ३९ च्या सरासरीने ११५ धावा केल्या. त्याचबरोबर टी २० मालिकेमध्ये त्याने ५ सामन्यांत २९ च्या सरासरीने १४४ धावा फटकावल्या. तथापि, दोन्ही मालिकांमध्ये इंग्लंडला भारताच्या हातून पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Advertisement

मिशेल मार्शने आयपीएल २०२१ मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, कारण तो कोरोना प्रोटोकॉलमध्ये जास्त काळ राहू शकत नव्हता. त्याने बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबाद यांनाही आपल्या निर्णयाची माहिती दिली. मार्शला काही कारणास्तव आयपीएलमधून आपले नाव मागे घ्यावे लागण्याची ही पहिली वेळ नाही.

Advertisement

यंदा ११ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद आपला पहिला सामना खेळेल. शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्ससोबत त्यांचा पहिला सामना असेल. दोन्ही संघांमधील सामना सायंकाळी साडेसहा वाजता चेन्नईत खेळला जाईल. हैदराबाद सनरायझर्सचा शेवटचा सामनाही कोलकाता नाइट रायडर्सशी २१ मे ला होणार आहे.

Advertisement

सनरायझर्स हैदराबाद संघ : डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन), केन विल्यमसन, जॉनी बेयरस्टो, मनीष पांडे, श्रीवत गोस्वामी, रिद्धिमान साहा, प्रियांम गर्ग, विजय शंकर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, विराट सिंग, मिशेल मार्श, जेसन होल्डर, मोहम्मद नबी, रशीद खान, शाहबाज नदीम, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, बासिल थंपी, जगदीशा सुचित, केदार जाधव, मुजीब उर रहमान. 

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply