Take a fresh look at your lifestyle.

‘ही’ फळभाजी आहे १ लाख रुपये / किलो; पहा कशा पद्धतीने केली जाते याची शेती

बिहारमधील एका शेतकर्याने आंतरराष्ट्रीय बाजारात चढ्या किंमतीला विकल्या जाणार्या  अनोख्या भाजीपाला लागवडीस सुरुवात केली आहे. नवीननगर तालुक्यातील करमदीह खेड्यातील शेतकरी अमरेशसिंग ( वय ३८ ) यांनी बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात विविध चाचणीच्या आधारे ‘हॉप-शूट्स’ (hop shoots) नावाच्या भाजीपाला लागवडीस सुरूवात केली आहे. या एक किलो फळभाजीची किंमत सुमारे १ लाख रुपये इतकी आहे.

Advertisement

इंटरमीडिएट पास केलेल्या अमरेशसिंग हॉप-शूट्सफळभाजी पिकवणारी पहिली व्यक्ती आहे…

Advertisement

न्यू इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृतानुसार, अमरेशसिंग जो सेंट मधून इंटरमीडिएट पास आहे. कोलंबस कॉलेज, हजारीबाग येथून पहिल्या श्रेणीतून उत्तीर्ण झालेल्या अमरेशसिंग यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. सुमारे सहा वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात ‘या फळभाजीस’ एक हजार पौंड प्रति किलोपर्यंतचा भाव मिळाला आहे. भारतीय बाजारपेठेत याला फार किरकोळ मागणी आहे. मागणीनुसार, फळभाजीचा पुरवठा केला जातो.  अमरेश सिंह यांच्या मते, ६० टक्के लागवड यशस्वी झाली आहे.

Advertisement

हॉप-शूट्स लागवडीस सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे : अमरेश सिंह 

Advertisement

सिंह म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी हॉप शूटच्या वाढीसाठी आणि लागवडीसाठी खास व्यवस्था केली तर सुमारे २ वर्षांच्या कालावधीत शेतकरी त्यांच्या उत्पन्नाच्या दहा पटीने अधिक कमावतील. वाराणसी येथील भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेचे कृषी वैज्ञानिक डॉ. लाल हे हॉप-शूटच्या लागवडीवर देखरेखीचे काम करीत आहेत. वाराणसी येथील भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेतून आणल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी या भाजीची रोपे लावली आहेत. या प्रयोगाच्या यशस्वीतेनंतर बिहारसह देशभरात हॉप शूटची लागवड मोठ्या प्रमाणावर होईल.   

Advertisement

हॉप-शूट्सचा वापर शीत पेय आणि औषधांमध्ये 

Advertisement

सिंग म्हणाले की, हॉप-शूटचे फळ आणि स्टेम पेय पदार्थ बनविणे, बिअर बनविणे आणि अँटीबायोटिक्स तयार करण्यासारख्या वैद्यकीय उद्देशाने वापरतात. हॉप-शूटच्या स्टेमपासून तयार केलेले औषध क्षयरोगाच्या (टीबी) उपचारात उच्च गुणकारी परिणाम असल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

‘या फुलाला हो-कॉन्स किंवा स्ट्रॉबिल म्हणतात, जे बीयर तयार करताना स्थिरता एजंट म्हणून वापरले जाते. बाकीचे मुळ्या व छोटी खोडांचा वापर अन्न आणि औषधाच्या निर्मिती प्रक्रियेत केला जातो,’ सिंह म्हणाले. युरोपियन देशांमध्ये त्वचा तरुण आणि चमकदार ठेवण्यासाठी वापरल्या जाणार्या कॉस्मेटिक प्रोडक्ट तयार करण्यासाठी ‘ही’ फळभाजी उपयुक्त आहे. अमरेश सिंह इतर अनेक औषधी व सुगंधी वनस्पतींचीही लागवड करतात. 

Advertisement

“शेती क्षेत्रात आत्मविश्वासासह जोखीम घेतल्यास शेतकऱ्यांना नक्की यश मिळेल, असा विश्वास सिंह यांनी सांगितले. बिहारमध्ये हॉप-शूटच्या लागवडीचा प्रयोग मीही मोठा धोका पत्करला आहे. मात्र, यातून शेती क्षेत्रात एक आदर्श उभा राहील, असे सिंह यांनी म्हटले आहे.

Advertisement

हॉप-शूट्स मानवी शरीरातील कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यात प्रभावी आहे

Advertisement

इंडियन एक्सप्रेसच्या लेखानुसार, ११ व्या शतकाच्या सुरूवातीस हॉप-शूट्सचा शोध लागला जेव्हा, ते बीअरमध्ये फ्लेवरिंग एजंट म्हणून वापरले गेले. त्यानंतर ते अन्न आणि औषधांमध्ये वापरले जाऊ लागले. या भाजीमध्ये ह्युमुलोन्स आणि ल्युपुलोन्स नावाचे अॅसिड असतात. ज्या मानवी शरीरातील कर्करोगाच्या पेशी नष्ट करतात, असे मत काही संशोधकांनी व्यक्त केले आहे. हे अॅसिड पाचक प्रणाली सुधारण्यासाठी, औदासिन्य, चिंता, वेदनाशामक औषध म्हणून आणि निद्रानाश बरे करण्यासाठीच्या औषधांमध्ये देखील वापरली जाते. ब्रिटन, जर्मनी या युरोपियन देशांमध्ये हॉप-शूट्सची लागवड केली जाते. हिमाचल प्रदेशात त्याची लागवड सुरू झाली होती पण ती यशस्वी झाली नाही कारण, त्याला ग्राहक मिळणे मुश्कील आहे.  त्याची किंमत जास्त असल्याने बाजारपेठ उपलब्ध होत नाही.  

Advertisement

विशेष नोंद : सदर शेतीबाबतचे प्रयोग अनेक ठिकाणी झाले आहेत. मात्र, वातावरण आणि बाजारपेठेची उपलब्धता आदी कारणांमुळे ते प्रयोग अयशस्वी झाले आहेत. त्यामुळे असे प्रयोग किंवा हॉप-शूट्सची शेती करतांना तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. आपण जोखीम घेताना खबरदारी घ्यावी. 

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply