Take a fresh look at your lifestyle.

आठवण : त्यामुळे आजच्या दिवशीच भंगले कोट्यावधी भारतीयांचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न..!

मुंबई :

Advertisement

भारतात २०१६ साली खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. ३१ मार्च रोजी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा सामना वेस्ट इंडिजशी झाला. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात आला. या सामन्यात भारताने शानदार कामगिरी करूनही पराभव स्विकारावा लागला. वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज आंद्रे रसेल आणि लेंडल सिमन्स यांनी टीम इंडियाच्या आशा धुळीस मिळवत भारताला ७ गडी राखून पराभूत केले होते.

Advertisement

टी २० विश्वचषकाच्या या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले. डाव सुरू करण्यासाठी आलेल्या रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेने पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची जोरदार खेळी केली. रोहित ३१ चेंडूंत ४३ धावांवर बाद झाला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विराट कोहलीने दमदार फलंदाजी केली. विराट व रहाणे यांनी ६६ धावांची भागीदारी केली. रहाणे ४० धावांवर बाद झाला पण विराटने आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली. त्याने स्फोटक फलंदाजी करताना ४७ चेंडूंत नाबाद ८९ धावा फटकावल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार धोनीनेही ९ चेंडूत १५ धावा केल्या. या सामन्यात भारताने २ बाद १९२ धावांची प्रचंड धावसंख्या उभारली.

Advertisement

वेस्ट इंडीज संघाची सुरुवात खराब झाली आणि पहिली विकेट केवळ ६ धावांवर पडली. ख्रिस गेलला फक्त ५ धावा करता आल्या. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मार्लन सॅम्युएल्सही जास्त वेळ क्रीजवर थांबला नाही आणि तो ८ धावा करुन बाद झाला. दोन विकेट लवकर पडल्यानंतर असे वाटत होते की टीम इंडिया आता हा सामना जिंकेल. मात्र सलामीवीर जॉनसन चार्ल्सने आक्रमक फलंदाजी केली. चार्ल्स ५२ धावांवर बाद झाला.

Advertisement

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या लेंडल सिमन्सने भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढविला. दुसऱ्या बाजूला आंद्रे रसेलनेही तुफानी फलंदाजी सुरू ठेवली. ५१ चेंडूंत ८२ धावा करून सिमन्स नाबाद राहिला. त्याने ७ चौकार आणि ५ षटकार लगावले. रसेलने २० चेंडूत नाबाद ४३ धावा केल्या. वेस्ट इंडिजने २ चेंडू शिल्लक ठेवत १९३ धावांचे लक्ष्य गाठले आणि करोडो भारतीयांचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply