Take a fresh look at your lifestyle.

अरे वा.. ‘ही’ मोटार सायकल आहे एवढी स्वस्त..!

मुंबई :

Advertisement

पेट्रोल डिझेलच्या वाढत जाणाऱ्या किमतींमुळे भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रीक वाहनांना मागणी वाढत आहे. या वाहनांद्वारे प्रदूषण होत नाही. तसेच पेट्रोल व डिझेलला पर्याय म्हणून इलेक्ट्रीक वाहनांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे बऱ्याच वाहन कंपन्या आता इलेक्ट्रीक वाहने लाँच करत आहेत. डेटेल इंडियाने अशीच एक किफायतशीर इलेक्ट्रीक दुचाकी मोटारसायकल लाँच केली आहे. या मोपेडची किंमत १९ हजार ९९९ आहे.

Advertisement

नवीन ‘डेटेल इझी’ इलेक्ट्रिक मोपेड बाजारात जेट ब्लॅक, पर्ल व्हाइट आणि मेटलिक रेड कलरसह एकूण तीन रंगांसह बाजारात उपलब्ध आहे. डेटेल इझी मध्ये कंपनीने २५० डब्ल्यू क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. यात ४८ व्ही क्षमतेची १२ एएच लीफीपीओ ४ बॅटरी वापरली आहे. कंपनी दावा करते की, इलेक्ट्रिक मोपेड सिंगल चार्जसाठी ६० किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. या मोपेडची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ७ ते ८ तास लागतात. मोपेडचा वरचा वेग ताशी २५ किलोमीटर आहे.

Advertisement

सर्वसामान्यांचा विचार करुन मोटार सायकलची किंमत ठरवण्यात आली आहे. सध्या पेट्रोल डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपासून दर कमी होत असले तरी अजूनही पेट्रोल डिझेल सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. सध्या दर कमी होत असले तरी भविष्यात कमीच राहतील याची शाश्वती नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रीक वाहनांना मागणी वाढली आहे. नागरिक या वाहनांची खरेदीही करत आहेत.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply