Take a fresh look at your lifestyle.

पेच मिटला; ‘दिल्ली कॅपिटल’च्या कर्णधारपदी अखेर ‘या’ खेळाडूची वर्णी..!

दिल्ली :

Advertisement

दिल्ली कॅपिटलने विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला आपला नवीन कर्णधार म्हणून नेमले आहे. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर दिल्लीच्या संघापुढे कर्णधार निवडीचा मोठा पेचप्रसंग होता. रहाणे, स्मिथ, अश्विन, पंत या दिग्गज खेळाडूंमध्ये या पदासाठी रस्सीखेच पहावयास मिळत होती. मात्र, अखेर पंतच्या गळ्यात कर्णदारपदाची माळ पडली.

Advertisement

पंतच्या निवडीबद्दल दिल्ली कॅपिटलचे प्रशिक्षक रिकी पॉंटींग आणि श्रेयस अय्यरसुद्धा खूष आहेत. पंतला नेतृत्व करण्याची ही उत्तम संधी असल्याचे पॉटींग म्हणाला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पंतने केलेल्या दमदार कामगिरीचे हे फळ असल्याचे बोलले जाते.

Advertisement

याबाबत रिकी पॉटिंग म्हणाला की, श्रेयसच्या नेतृत्वात संघाने दोन्ही हंगामात केलेली कामगिरी अविश्वसनीय असून सामन्यांचे निकालही या गोष्टीची साक्ष देतात. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध यशस्वीरित्या पार पडलेल्या मालिका तरुण ऋषभसाठी फलदायी ठरल्या आहेत. मिळालेली ही नवी भूमिकाही तो उत्तमपणे पार पाडेल असा विश्वास त्याने व्यक्त केला. कोचिंग ग्रुप त्याच्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहे आणि आम्ही या हंगामाच्या प्रारंभाच्या प्रतीक्षेत असल्याचेही तो म्हणाला.

Advertisement

दरम्यान, याबाबत अय्यर म्हणाला की, जेव्हा मला खांद्याला दुखापत झाली आणि संघाला नवीन कर्णधार निवडायचा असल्याचे समजले तेव्हा मला याविषयी कोणतीही शंका नव्हती की ऋषभ संघाचे नेतृत्व करेल. त्याला संघाला पुढे नेण्यासाठी मी शुभेच्छा देतो. आपल्या नवीन भूमिकेबद्दल २३ वर्षीय पंत म्हणाला की, मी आयपीएलचा प्रवास सहा वर्षांपूर्वी दिल्ली संघाकडून सुरू केला होता. या संघाचे नेतृत्व करण्याचे माझे स्वप्न होते. मला या पदासाठी पात्र मानणाऱ्या सर्वांची मी आभारी आहे.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply