Take a fresh look at your lifestyle.

झाला निर्णय; त्याच्यामध्ये त्याठिकाणी होणार भारत-पाकिस्तानची क्रिकेट मालिका

मुंबई :

Advertisement

भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामन्यासाठी अनेक वर्षांपासून वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या दोन्ही संघांमध्ये क्रिकेट मालिका आयोजित करण्यात आली असून २ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या ट्राय-ट्वेंटी-२० मालिकेमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांशी भिडतील. ब्लाइंड क्रिकेट संघात हे सामने होणार आहेत.

Advertisement

जरी हे सामने तीन देशांच्या अंध क्रिकेट संघांदरम्यान खेळले जाणार असतील परंतु भारत आणि पाकिस्तानचा संघ कोणत्याही खेळाच्या प्रकारात मैदानात उतरले तरी सामने रंगदार होणार हे निश्चित आहे. ही तिरंगी टी २० मालिका २ एप्रिलपासून सुरू होईल आणि ८ एप्रिलपर्यंत चालेल.

Advertisement

टी २० मालिकेत भारत आणि पाकिस्तानशिवाय तिसरा संघ बांगलादेशचा असेल. सर्व सामने ढाका येथे खेळले जातील. पाकिस्तान ब्लाइंड क्रिकेट कौन्सिलने म्हटले आहे की पाकिस्तान, भारत आणि बांगलादेशचे संघ तिरंगी टी-२० मालिकेमध्ये भाग घेत आहेत. परिषदेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारत आणि पाकिस्तानच्या संघांमध्ये पहिला सामना ४ एप्रिलला होणार आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारत आणि बांगलादेश यांच्यात स्पर्धा होईल. २ एप्रिल रोजी भारतीय संघ बांगलादेशशी भिडणार आहे.

Advertisement

पाकिस्तान ब्लाइंड क्रिकेट कौन्सिलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, टी २० मालिकेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडू आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट केली गेली आहे. या चाचणीत सर्व जण निगेटीव्ह असल्याचे आढळले आहे. भारत आणि बांगलादेशच्या खेळाडूंची चाचणीही निगेटीव्ह आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

Advertisement

भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन एप्रिलला उद्घाटनाचा सामना होईल, तर पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात ३ एप्रिलला सामना होईल. ४ एप्रिल रोजी भारत आणि पाकिस्तानचे संघ आपसात भिडतील. ५ एप्रिल हा विश्रांतीचा दिवस असेल आणि त्यानंतर ६ एप्रिलला पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सामना होईल. ७ एप्रिलला भारतीय संघ पुन्हा एकदा पाकिस्तानशी सामना करेल. विजेत्या दोन संघांदरम्यान ८ एप्रिल रोजी अंतिम सामना खेळला जाईल. 

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply