Take a fresh look at your lifestyle.

करोना रुग्णाबाबत आला ‘हा’ महत्वाचा आदेश; पहा नगरमध्ये नेमका काय झालाय निर्णय

अहमदनगर :

Advertisement

शहरासह जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या भरमसाठ वाढत आहे. अशावेळी लॉकडाऊन होनरा अशी चर्चा असतानाच राज्यभरातून टाळेबंदी करण्यास विरोध असल्याच्या पार्श्वभूमीवर नियमांची कदम अमलबजावणी केली जाणार आहे. अशावेळी नगरमध्ये आणि जिल्ह्यात बाधित आलेला कोणत्याही रुग्णाला गृह अलगीकरणाची (होम आयसोलेशन) परवानगी दिली जाणार नाही. त्यांना सक्तीने कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत.

Advertisement

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सर्व तालुकास्तरीय यंत्रणांचा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिृकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, उपजिल्हाधिकारी उदय किसवे, उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वीरेंद्र बडदे, अन्न व औषध प्रशासन अधिकारी अशोक राठोड आदी यावेळी उपस्थित होते.

Advertisement

वाढती कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा. कोरोना संसर्गास कारणीभूत ठरणार्‍या आणि नियम न पाळणार्‍यांवर कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले आहेत.

Advertisement

सध्या दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढताना दिसते आहे. मात्र, त्याच प्रमाणात बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांच्याही चाचण्या होणे गरजेचे आहे. तालुकास्तरीय सर्व यंत्रणांनी तसेच अगदी गावपातळीवरही याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.  त्यासाठी जी पथके कार्यरत करण्यात आली आहेत, त्यांनी याची कडक अंमलबजावणी करावी. संसर्गाची साखळी तोडणे गरजेचे असून त्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था तसेच प्रत्यक्ष लोकसहभाग महत्वाचा आहे. रुग्ण संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी लक्षणे असणार्‍या अथवा त्रास जाणवणार्‍या व्यक्तींनी तात्काळ उपचार घेणे गरजेचे आहे तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वताची चाचणी करुन घेतली पाहिजे, असेही डॉ. भोसले यांनी म्हटले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply