Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. अवघड आहे की.. लिंबू पाणी पिण्याचे आहेत दुष्परिणामही; वाचा महत्वाची माहिती

उन्हाळा आल्यावर लिंबू पाणी आणि इतर थंडावा देणारे पेय यांची मागणी वाढते. तसेतर लिंबू पाणी हे आरोग्यासाठी चांगले असते. मात्र, कोणतीही गोष्ट चांगली आहे म्हणून अतिसेवन केल्यास त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतातच की. तसाच प्रकार लिंबू पाण्याच्या बाबतीतही आहे. आज आपण हेच पाहणार आहोत.

Advertisement

याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम असे :

Advertisement

कमकुवत हाडे : जास्त प्रमाणात लिंबाचे सेवन केल्याने हाडे कमकुवत होतात. लिंबामध्ये असणारे आम्ल हाडांवर परिणाम करते.

Advertisement

मायग्रेनची भीती : लिंबूपाण्याचे जास्त सेवन करणाऱ्या मंडळींना मायग्रेनचा धोका असतो.

Advertisement

पोटाची समस्या : जास्त प्रमाणात लिंबाचे पाणी पिण्यामुळे पोट खराब होण्याचीही भीती असते. यातील जास्त प्रमाणात असलेल्या आम्लामुळे अन्न पचवताना लागणाऱ्या आम्लाचे प्रमाण असंतुलित होऊन पोटदुखी आणि जळजळ होण्यासारख्या समस्या उद्भवू शकते.

Advertisement

छातीत जळजळ : जास्त लिंबू पाणी पिल्याने छातीत जळजळ होते. लिंबामध्ये असणारे आम्ल हे त्याचे कारण आहे. जेव्हा अन्ननलिका आणि पोट योग्यप्रकारे कार्य करत नाहीत आणि पोटातून बाहेर येणारा आम्ल अन्ननलिकेत परत येतो त्यावेळी छातीत जळजळ होते.

Advertisement

दात खराब होणे : संशोधनातून असे दिसून आले आहे की लिंबामध्ये असणारे सायट्रिक आम्ल दात आठवड्यात करतात. लिंबूवर्गीय फळामध्ये सायट्रिक आम्ल दातच्या बाह्य थराला नुकसान करते.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply